पुणे (हवेलीनामा आॕनलाईन) पुणे शहराचे वाढते नागरिकिकरणामुळे शहरालगतच्या गावांमधील लोकसंख्यात वरचेवर वाढ होत आहे पश्चिम भागातील मुळशी तालुक्यातील आयटी हब म्हणून नावारुपाला आलेल्या हिंजवडी, माण,मारुंजी या गावावर लोकसंख्यची घनता वाढलेली आहे त्यामुळे स्थानिक प्रशासनाला नागरिकी सुविधा पुरवताना मोठा ताण येतो. अशाच स्वरुपातील मांरुजी येथील सरकार चौक परिसरात वाढलेल्या नागरिकीकरणामुळे विजेची मागणी वाढलेली असल्याने,सध्या वापरात असलेल्या १००केव्ही विघुत रोहिञा ऐवजी तेथे २००केव्ही रोहिञ बसवून विजेची कमतरता दूर करावी अशी मागणी हिंजवडीचे माजी सरपंच सागर साखरे,राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे हिंजवडी माण जिल्हापरिषद गटाचे अध्यक्ष समीर बुचडे,यांनी बारामती लोक सभा मंतदार संघाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भेटून या संदर्भात निवदेन दिले व अडचणीची महिती दिली यावर खासदार सुळे यांनी महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांस फोन करुन तात्काळ वीज समस्येची अडचण दुर करण्याच्या सूचना दिल्या यावेळी मारुंजीचे माजी उपसंरपच विकास जगताप व कपिल बुचडे उपस्थित होते
