हडपसर (हवेलीनामा ऑनलाइन) हडपसर पोलीस स्टेशनच्या हद्दीत असणारी गर्दीच्या ठिकाणी जसे भाजीमार्केट, बाजारपेठ, मॉल येथे दिवाळी सणाची खरेदी करण्यासाठी येणाऱ्यांची संख्या अधिक असल्याने याठिकाणी दुचाकी चोरीचे प्रमाण वाढले. वाहन चोरीला प्रतिबंध करण्यासाठी हडपसर पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकातील अधिकारी सहा.पोलीस निरीक्षक हनुमंत गायकवाड व पोलीस उपनिरीक्षक सौरभ माने तसेच तपास पथकातील अंमलदार हे काम करीत असताना, पोलीस अंमलदार शाहिद शेख व प्रदिप सोनावणे यांना त्यांच्या गोपनीय बातमीदाराकडून माहिती मिळाली की, हडपसर पोलीस स्टेशन हद्दीतून एक अल्पवयीन मुलगा व त्याचे साथीदार हे दुचाकी वाहने चोरी करून सोलापूर महामार्गाने गाडी घेवून निघून जात असतात.
मिळालेल्या माहितीच्या आधारे हडपसर पोलीस स्टेशनचे तपास पथकाचे प्रभारी सहा.पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उप निरीक्षक माने, पोलीस अंमलदार प्रदिप सोनवणे, शाहिद शेख, समीर पांडुळे, शशिकांत नाळे, निखिल पवार, प्रशांत दुधाळ, प्रशांत टोणपे असे काम करीत असताना, तांत्रिक विश्लेषनाच्या आधारे एक अल्पवयीन मुलगा व त्याचे साथीदार हे दुचाकी वाहनांची टेहळणी करीत असताना निदर्शनास आले ज्या मार्गे येतात ते ठिकाण निश्चित करून फुरसुंगी सार्वजनिक शौचालय जवळ सापळा रचून हे संशयित रस्त्यालगत असणाऱ्या जागेत उभ्या असलेल्या वाहनांची टेहळणी करीत असताना मिळून आल्याने त्यांना ताब्यात घेऊन त्यांना त्यांचे नाव पत्ते विचारले असता त्यांनी त्यांची नावे १) युनूस निजाम मुल्ला, वय:- २५ वर्षे, रा.सध्या.गल्ली नं.१६, साय्यदनगर, हडपसर,पुणे. मुळगाव:- मु.पो.चिंचोली, ता.उमरगा, जिल्हा.उस्मानाबाद. २) हनुमंत शंकर वाकडे, वय:- २२ वर्षे, रा.मु.पो.आलुर, ता.उमरगा, जिल्हा.उस्मानाबाद. ३) दीपक उर्फ खंडू तातेसाहेब कटकधोंड, वय:- २४ वर्षे, रा. केसर जवळा, ता.उमरगा, जिल्हा.उस्मानाबाद. तसेच एक विधीसंघर्शित बालक यांना त्यांचे ताब्यात मिळून आलेले मोटारसायकल सह ताब्यात घेवून पोलीस स्टेशन मध्ये आणले व त्यांचेकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, आम्ही वेळोवेळी आपसात ग्रुप बनवून हडपसर, वानवडी, स्वारगेट, फरासखाना, या भागातील गर्दीच्या ठिकाणी जावून गाड्यांची टेहळणी करण्याकरिता विधी संघर्शित बालक यास पुढे पाठवून, गाडी पार्क केलेला व्यक्ती कोठे जात आहेत हे पाहून तो गेल्यानंतर ती दुचाकी बनावट चावीच्या आधारे चोरी करीत होतो. व दुचाकी चोरी करून निघून जात होतो.अशा पद्धतीने आम्ही सर्वांनी मिळून आज पर्यंत १३ दुचाकी चोरीचे गुन्हे केलेले आहेत.या वाहनांची किंमत रू.०५,००,०००/- इतकी आहे.
ही कामगिरी नामदेव चव्हाण, अप्पर पोलिस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे व नम्रता पाटील, पोलीस उप आयुक्त, परिमंडळ ५ पुणे शहर, यांचे सूचना व मार्गदर्शनाखाली कल्याणराव विधाते, सहाय्यक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग पुणे, बाळकृष्ण कदम, वरिष्ठ पोलीस निरीक्षक हडपसर पोलीस स्टेशन, पुणे शहर,राजु अडागळे पोलीस निरीक्षक गुन्हे, दिगंबर शिंदे पोलीस निरीक्षक गुन्हे यांचे सूचनाप्रमाणे तपास पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक.हनुमंत गायकवाड, पोलीस उप निरीक्षक .सौरभ माने, पोलीस अंमलदार प्रदीप सोनवणे, प्रताप गायकवाड,गणेश क्षीरसागर,अविनाश गोसावी, संदीप राठोड, समीर पांडुळे, शाहिद शेख, शशिकांत नाळे,सचिन जाधव, प्रशांत दुधाळ, निखिल पवार, प्रशांत टोणपे, रियाज शेख,सचिन गोरखे यांचे पथकाने केली आहे.
