वाघोली (हवेलीनामा ऑनलाइन)

माजी उपसरपंच समीर भाडळे व ग्रामपंचायत  सदस्या पुजा भाडळे यांच्या माध्यमातून लहान मुलांना प्रोत्साहन देण्यासाठी दिवाळीनिमित्त किल्ले स्पर्धा आयोजित केली आहे.यात  विजेत्यांना आकर्षक बक्षीसे दिली जाणार आहेत ही स्पर्धा मुलं आणि मुलींसाठी आहे.यासाठी वयोमर्यादा ६ वर्ष ते १६ वर्ष अशी असेल. स्पर्धेत पाच आकर्षण बक्षिसे असुन यामध्ये स्मार्ट फोन, सायकल, बॅटमिंटन सेट, कॅरम बोर्ड,फुटबॉल अशी विविध आकर्षण बक्षिसे आहेत. त्याचप्रमाणे सहभाग घेणाऱ्या सर्व स्पर्धकांस सन्मान चिन्ह देणार आहे. स्पर्धकांनी तयार केलेल्या किल्याचे फोटो व व्हिडिओ नाव, मो.नंबर,पत्ता 9890100808 या नंबर वर पाठवा असे सांगितले आहे. ४ नोव्हेंबर हि नाव नोदणीची शेवटची तारीख असेल त्या पुर्वी स्पर्धकांनी नोंदणी करुन घ्यावी असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *