औरंगाबाद (हवेलीनामा ऑनलाइन) कोरोना विषाणुची लाटेचे प्रमाण सध्या शहरातुन निष्प्रभ होत असल्याचे चित्र पहावयास मिळत असुन सर्वच राजकीय पक्षांनी आगामी येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीकडे लक्ष केंद्रीत केले आहे याचाच भाग म्हणजे मनसेने शहरात आपली पकड घट्ट करण्यासाठी आणखी घट्ट करण्यासाठी एकाच दिवशी पश्चिम विधानसभा मतदान संघात एकाच दिवशी तीन शाखाचे ऊद्घाटन केले .या तिन शाखा प्रामुख्याने वार्ड क्र.१४ मिटमिटा, वार्ड क्र १०५ राहुलनगर, सादातनगर, तसेच वार्ड क्र.१०९ सुतगिरणी इंदिरानगर या भागात मनसेच्या या शाखा उघडण्यात आल्या.या शाखेचे उद्घाटन मनसेचे जिल्हा अध्यक्ष सुहास दशरथे, शहर अध्यक्ष सतनामसिंग गुलाटी याच्या हस्ते करण्यात आले .या ऊद्घाटनप्रसंगी उपशहर अध्यक्ष गजानन गौडापाटील, आशिष सुरडकर, जिल्हा सचिव सतबीरसिंह रंधावा ,अब्दुल रशीद, यासह अशोक पवार, संदीप कुलकर्णी, योगेश पवार, विशाल भालेराव, रितेश देवरे, जयदीप लोखंडे, अमित पायमोडे, प्रल्हाद लहीरे,राजेश पुरी,रूषिकेश महाजन, सचिन दाभाडे, मनोज शिंदे, बलजिते जंगले, आदीची उपस्थिती होती.
या कार्यक्रमाचे आयोजन उपशहर अध्यक्ष गजानन गौडापाटील यानी केले तसेच विशेष पुढाकार घेत सर्व शाखेचे नियोजन केले .
