किरण खुडे
राजगुरुनगर  (हवेलीनामा ऑनलाइन) खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत बेकायदा दारू विक्री करणाऱ्याला एक वर्षासाठी जेरबंद करण्यात आले आहे. महाराष्ट्र प्रोहिबिशन ऑफ डेंजरस ऍक्टिव्हिटी कायद्यांतर्गत ही कारवाई करण्यात आली आहे. सुरेश जयसिंग राठोड (वय ४९, रा. ठाकरवस्ती, नानेकरवाडी ता. खेड) असे अटक केलेल्या आरोपीचे आहे.या कारवाईमुळे वाढत्या गुन्हेगारीला आळा बसणार आहे.
          खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीकीकरण झालेले आहे. याच औद्योगीकीकरण क्षेत्रामध्ये गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक बेकायदा व्यवसाय करून गैरमार्गाने आर्थिक प्राप्ती करण्यासाठी दहशत निर्माण करून करीत असतात. अशा गुन्हेगारांना वेळीच आळा घालून त्यांचेवर प्रचलित कायद्यान्वये कारवाई करण्याचे आदेश पुणे ग्रामीणच्या पोलीस अधिक्षकांनी दिले आहेत. त्या अनुशंगाने खेडचे पोलिस निरीक्षक सतिश गुरव यांनी खेड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुन्हेगारांवर वचक बसविण्यासाठी गुन्हेगारी टोळीवर मोक्का अंतर्गत यापुर्वी कारवाई केली होती. तसेच बेकायदा  हातभट्टीची दारू तयार करून ती दारू विक्री करणाऱ्या व्यक्तींची यादी तयार केली. त्यामध्ये सुरेश जयसिंग राठोड याच्यावर बेकायदा दारूविक्री करण्याबाबत सहा गंभीर गुन्हे दाखल असल्याने त्याच्याविरूध्द खेड पोलीस ठाण्यात ए.पी.डी.ए कायद्यांतर्गत प्रस्ताव तयार करून हा प्रस्ताव पुणे ग्रामीणचे पोलीस अधिक्षक, जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकार यांच्याकडे सादर करण्यात आला होता. त्यानुसार सुरेश राठोड हा हातभट्टीवाला व्यक्ती या सदराखाली त्यास एक वर्षे स्थानबध्द करण्याचे आदेश पारीत केले आहेत. त्यानंतर सुरेश जयसिंग राठोड यांस खेड पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. पोलीस निरीक्षक सतिश गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले, पोलीस अंमलदार संतोष घोलप, दत्तात्रय जगताप, सचिन जतकर, बाळकृष्ण भोईर, शेखर भोईर, संदीप चौधरी, निखील गिरीगोसावी, स्वप्नील गाढवे, विशाल कोठावळे, योगेश भंडारे, सागर शिंगाडे, प्रतिक खरबस यांनी कारवाई केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *