लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन) पुणे सोलापूर महामारगावरील मोठया लोकवस्तीचे गाव असलेल्या लोणी काळभोर गावच्या उपसरपंच पदी संगीता सखाराम काळभोर यांची बिनविरोध निवड झाली ज्योती अमित काळभोर यांनी उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेसाठी आज ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया पार पडली यात केवळ संगीता काळभोर यांचा एकमेव अर्ज आल्याने त्याची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले
सतरा सदस्य असलेल्या या ग्रामपंचायतमध्ये आज सरपंच राजाराम काळभोर यांच्या अध्यक्षतेखाली ही निवड प्रक्रिया पूर्ण झाली यावेळी निवडणूक अधिकारी म्हणून ग्रामविकास अधिकारी संतोष गायकवाड यांनी काम पाहिले.आज विशेष सभेचे आयोजन केले होते त्यात एकूण १४ ग्रामपंचायत सदस्य उपस्थित होते. उपसरपंच पदासाठी निर्धारित वेळेत केवळ संगीता काळभोर यांचा अर्ज आला होता त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
त्यांच्या निवडीनंतर नवनिर्वाचित उपसरपंचाचा सत्कार करण्यात आला यावेळी यशवंतचे माजी उपाध्यक्ष माधव काळभोर,माजी जिल्हा परिषद सदस्य विलास काळभोर, साधना सहकारी बँकचे संचालक सुभाष काळभोर, महाराष्ट्र केसरी राहुल काळभोर, पंचायत समितीचे माजी उपसभापती व विद्यमान सदस्य सनी काळभोर, हवेली तालुका कॉग्रेसचे शिवदास काळभोर, ग्रामपंचायत सदस्य सदस्य योगेश काळभोर, नागेश काळभोर, भरत काळभोर, गणेश कांबळे, सदस्या ज्योती अमित काळभोर, साविता गीताराम लांडगे, प्रियांका सचिन काळभोर, ललिता राजेंद्र काळभोर, माधुरी राजेंद्र काळभोर, भारती राजाराम काळभोर, रत्नाबाई राजाराम वाळके, संगीता सखाराम काळभोर, बकुळा पांडुरंग केसकर आणि ग्रामपंचायत कर्मचारी वृंद आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
