बारामती (हवेलीनामा ऑनलाईन) मित्राच्या घरी जाऊन त्याच्या पत्नीची थोडी ओळख झाल्यानंतर तिचा मोबाईल नंबर मिळवून व समाज माध्यमातून अश्लील शेरेबाजी करत तिच्या फोटोत छेडछाड करून लज्जा उत्पन्न होईल असे संदेश प्रसारित केले त्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एकास गजाआड केले आहे.

एका मित्राच्या घरी येणे-जाणे होते त्याच्यातून  मित्राच्या पत्नीसोबत एक-दोन वेळा संवाद झाला होता, मित्राच्या पत्नी चा मोबाईल क्रमांक मिळवला व सदर मोबाईल क्रमांकावर सोशल मीडियाच्या मदतीने अश्लील शेरेबाजी केली तसेच सदर महिलेचा फोटो मिळून सदर फोटो मध्ये छेडछाड केली व सदर फोटो बदलून अश्लील इमेज तयार करून त्या महिलेला पाठवले सदर महिलेच्या मनास लज्जा उत्पन्न होईल अशा प्रकारचे मेसेजेस पाठवले सदर महिलेने पोलिस ठाण्याला तक्रार करताच बारामती शहर पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्र हलवले सदर मोबाईल क्रमांक बंद असतानासुद्धा सायबर सेल कडून माहिती घेऊन त्या व्यक्तीस ज्याचे नाव अभिजीत विजय हटकर राहणार माळेगाव बुद्रुक तालुका बारामती जिल्हा पुणे  निष्पन्न केला विशेष म्हणजे तो होमगार्ड आहे. त्याला तात्काळ अटक करण्यात आली पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्हा कबूल केला व त्याच्याकडून मोबाईल सुद्धा जप्त करण्यात आलेला आहे तो सायबर फॉरेन्सिक लॅब ला तपासणीसाठी पाठवण्यात येणार आहे यापुढे सुद्धा बारामती शहर पोलीस ठाण्यात तर्फे महिलांच्या प्रश्नांना अग्र क्रमांक देऊन ते तात्काळ सोडण्यात येणार आहेत तसेच कोणत्याही महिलेची छेडछाड किंवा तिच्यावर शेरेबाजी यावर तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक सुनील महाडिक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार गोपाळ ओमासे पोलीस नाईक किरण कदम व अतुल जाधव यांनी केलेला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *