थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन)
भारतीय जनता पक्षाच्या उरुळीकांचन शहर पदभार नियुक्ती बैठक घेऊन त्यात मुख्य नियुक्ती पदाधिकारी निवडण्यात आले यामध्ये आशुतोष दत्तात्रय तुपे यांची उरुळी कांचन शहर कार्याध्यक्ष पदी तर अजिंक्य संतोष कांचन यांची शहर युवा मोर्चा अध्यक्ष पदी व अक्षय बाळासाहेब रोडे यांची शहर आध्यात्मिक आघाडी अध्यक्षपदी निवड करण्यात आली
यावेळी भाजपा पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुनील कांचन, भाजपा हवेली तालुका अध्यक्ष संदीप भोंडवे, भाजपा महाराष्ट्र प्रदेश सचिव अनुसूचित जाति मोर्चा सौ.सारिका किशोर लोणारी, भाजपा पश्चिम महाराष्ट्र व्यापार आघाडी अध्यक्ष विकास जगताप, पुणे जिल्हा सहकोषाध्यक्ष श्रीकांत कांचन, सदस्य-क्षेत्रीय रेल्वे समिती अजिंक्य महादेव कांचन, उरुळी कांचन शहर अध्यक्ष अमित सतीश कांचन, महिला मोर्चा उरुळी कांचन शहर अध्यक्ष कविता शरद खेडेकर, ऋषिकेश बाळासाहेब शेळके, उरूळी कांचन शहर सोशल मीडिया अध्यक्ष शुभम बाळासाहेब वलटे, शहर कामगार आघाडी अध्यक्ष श्री.ऋषिकेश केरबा ढवळे, बापूसाहेब जराड, शरद खेडेकर, पूजा सणस, अक्षय कांचन, अजित कांचन, हरीश कांचन, अमोल हरीहर, कारण धुमाळ, मयूर कुंजीर, शुभम वेदपाठक इत्यादी मान्यवर उपस्थित होते.
