(टीम हवेलीनामा)
सर्व सणामध्ये दिवाळीचे अनन्यसाधारण महत्त्व आहे केवळ देशातच नाही तर संपूर्ण जगाच्या पाठीवर अनेक ठिकाणी हा सण साजरा होतो पण यावेळी सर्वसामान्य जनतेला महागाईने पुरते बेजार केले असून ऐन दिवाळीत शिमगा करण्याची वेळ आली आहे जवळपास दोन वर्षे कोरोनाचे आक्रमण त्यामुळे बेरोजगारी ओढवली आता दिवाळीच्या तोंडावर महागाई पसरली काय करावे कसे करावे हा प्रश्न उभा आहे.
नोकरदार मंडळींची अडचण नाही परंतु रोजंदारी करून घर प्रपंच चालविणाऱ्यावर खूप मोठा ताण येतो आहे प्रत्येक गोष्ट महाग झाली स्वयंपाकाचा गॅस हजाराच्या घरात पोहोचला आणि किराणा मालाची चढती कमान खाली उतरलीच नाही दैनंदिन जीवनातील तेल साखर डाळी यांचे दर चढेच राहिले आहेत त्यामुळे बजेट विस्कळीत झाले
दिवाळीच्या सणाला घरातील लहान मुलांना नवीन कपडे घेण्यासाठी घर प्रमुखकडे पैसे शिल्लक राहिले नाहीत यावर सरकार मायबाप म्हणून काहीही करताना दिसत नाही रेशन दुकानावर फक्त गहू आणि तांदूळ पुरवला जातो पूर्वी साखर, डाळ व तेल पुरवले जात असे पण सध्या तोही मिळत नाही
यावर महिलांनी अतिशय मार्मिक अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
“लॅाकडाऊन मधला आर्थिक खड्डा भरला नाही तोवर ऐन सणासुदीला ही महागाई,पेट्रोल डिझेल दरवाढ असेल ,खाद्यतेल,गॅस किराणा सगळ्या दरवाढी च्या कडे जनतेचे लक्ष टाळण्यासाठी कि काय हे सीबीआय छापे , आर्यन प्रकरण ह्या गोष्टींकडे जनतेचे लक्ष वेधू पाहत आहे . दरवाढी च्या बातम्या कुठे गायब केल्यात सरकार ने सर्वसामान्यांच्या विचार कधी करणार दरवाढीविषयी सरकार मुग गीळून का बसलय .प्रसारमाध्यमांनी दरवाढी चे विषय बोलले पाहिजे व ते प्रदर्शित केले पाहिजे सगळ्या वृत्त वाहिन्यांना ही विनंती आहे.” माजी सरपंच सुनिता धुमाळ.
“शासनाने या प्रश्नावर डोळ्याला पट्टी बांधली असल्याचे जाणवते गरीब माणूस महागाईमुळे मेटाकुटीला आला आहे त्यामुळे यावर नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे ” संध्या भोर उपाध्यक्ष हवेली तालुका राष्ट्रवादी काँग्रेस.
” इंधन दरवाढीचा अप्रत्यक्ष परिणाम बाजारपेठेवर पडला आहे त्यामुळे केंद्र सरकारने हे दर नियंत्रणात आणले पाहिजेत तसेच सर्वसामान्य जनतेला गॅस दर कमी करून मदत करावी,तसेच स्वस्त धान्य दुकानात सण साजरे करण्यासाठी साखर, हरबरा डाळ,तेल उपलब्ध करून घ्यावे ” सोनाली जवळकर, सरपंच आळंदी (म्हातोबा)
