पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) बँक ऑफ महाराष्ट्र पुर्व क्षेत्रीय कार्यालयाअंतर्गत येणाऱ्या ५ शाखाच्या माध्यमातून पूर्व हवेलीतील ४०  बचत गटांना रु ७६लाख ५१ हजारचे कर्ज मंजूर करण्यात आले.बँक ऑफ महाराष्ट्रच्या वतीने बचत गटांसाठी कर्ज वितरण व आर्थिक साक्षरता शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.देशाच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रथमच एवढ्या मोठया प्रमाणात बचत गटांना कर्ज मंजूर करण्यात आले .या शिबिरात बँक ऑफ महाराष्ट्राचे कार्यकारी संचालक ए.बी . विजयकुमार यांनी महिलांना बचत गटात पंचसूत्रीचे महत्व सांगितले व सतर्कतेबाबत सामुहिक शपथ देऊन महिलांना कर्ज पुरवठया संदर्भात मार्गदर्शन केले व त्यांच्या हस्ते बचत गटांना कर्जमंजुरीच्या पत्रांचे वाटप करण्यात आले . विवेक धवन यांनी बचत गटामार्फत महिलांनी स्वत: उद्योजक कसे बनता येईल याबाबत मार्गदर्शन केले या शिबिरात जवळपास ३५0 महिलांनी सहभाग घेतला. तसेच नियमित कर्ज परतफेड करणा-या व व्यवसायात उत्तम काम करणा-या बचतगटांना प्रशस्तीपत्रक देऊन गौरविण्यात आले.
            कर्ज वितरणावरोबरच आर्थिक साक्षरते संदर्भात जिल्हा वित्तीय साक्षरता आधिकारी अग्रणी बँक यांनी महिलांना लोकोपयोगी सामाजिक सुरक्षा योजना, सुरक्षाविमा जीवन विमा, अटल पेन्शन,कृपी योजना व लहान मोठया व्यवसायासाठीच्या विविध कर्ज योजनांची व वेळेवर कर्ज
परतफेडीचे फायदे यावर विस्तृत माहिती दिली.
       यावेळी कुंजीरवाडीच्या माजी सरपंच संगिता धुमाळ यांनी बचत गटाने बनविलेल्या मालाची विक्री
करण्यासाठी विविध माध्यमांची माहिती दिली . या कार्यक्रमाप्रसंगी ग्रामीण महिला व बालक
विकास मंडळ संस्थेचे सचिव संतोष गदादे तसेच सलग्न पाच शाखांचे शाखाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते . हे शिबीर यशस्वी होण्यासाठी संगिता काळभोर , मीना कुंभारकर , कमर खान यांनी विशेष परिश्रम घेतले . कार्यकमाचे सूत्रसंचालन पूजा सिन्हा व रश्मी कोटेचा यांनी केले.उप अंचल व्यवस्थापक शानवाग यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *