किरण खुडे
राजगुरुनगर (हवेलीनामा ऑनलाइन) शहरातील व्यापारी बांधवांच्या समस्यांवर चर्चा करण्यासाठी शनिवारी (दि. २३)रोजी आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्याशी वार्तालाप कार्यक्रम ठेवण्यात आला असून शहरातील सर्व व्यापारी बांधवांनी यासाठी उपस्थित राहण्याचे आवाहन व्यापारी प्रतिनिधी राम कडुसकर आणि रवींद्र गुजराथी यांनी केले आहे.
कोरोनानंतर सुरु झालेला व्यापार, त्यामध्ये आलेल्या अडचणी, विविध शासकीय कार्यालयांकडून केली जाणारी अडवणूक तसेच वाहतुकीची समस्या या विषयी तोडगा काढण्याकरिता हा वार्तालापाचा कार्यक्रम आयोजित केला असून, हा कार्यक्रम राजगुरूनगरच्या बाजारपेठेतील शास्त्री चौक येथे रात्री साडेआठ वाजता होणार असल्याचे कडुसकर यांनी सांगितले.
