पुणे (हवेलीनामा ऑनलाइन)  दरोडयाच्या तयारीत असणाया सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट ६ मधील पथकाने जेरबंद करून, जबरी चोरीचे एकूण ७ गुन्हे उघड केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
         पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गुन्हे शाखा, युनिट ६ मधील आधिकारी व पथक हे हद्दीमध्ये
गस्त घालत असताना पोलीस नाईक.बाळासाहेब सकटे यांना त्यांचे बातमीदारा मार्फत माहिती मिळाली की, गुन्हे अभिलेखावरील अक्षय लोंढे उर्फ चिकटया व त्याचे साथीदार हे लोणीकंद पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये बकोरी गाव ते कोळपेवाडी रस्त्यावर
बकोरी गावचे हद्दीत ओढयाजवळ अंधारात सार्वजनिक रस्त्यावर येणारे जाणारे वाहने तसेच पायी जाणाऱ्याना अडवून लूटमार करून दरोडा टाकण्याच्या तयारीत आहेत.ही माहिती गणेश माने, पोलीस निरीक्षक, यांना दिली त्यावर त्यांनी कारवाई करण्याचे आदेशित केल्याने पोलिस उपनिरीक्षक सुधीर टेंगले व पथक यांनी सापळा रचून त्यात १) अक्षय बाबासाहेब लोंढे वय २४ वर्षे, रा. वानवडी, पुणे, २) नितीन प्रकाश शिनगारे, वय ३८ वर्षे, रा. पठारेवस्ती, लोणी काळभोर, पुणे, ३) नवनाथ जनार्दन सावंत, वय ४१ वर्षे, रा. पुणे स्टेशन, पुणे,
४) मोहमद गौसपाक हाजीमलंग शेख, वय २३ वर्षे, रा. मंगळवार पेठ, पुणे यांना ताब्यात घेतले तर अंधाराचा फायदा घेवून त्यांचा एक साथीदार पळून गेला. त्यांच्याकडे दरोडा टाकण्याकरिता लागणारे साहित्य त्यामध्ये कोयता, चाकू, मिरची पूड,
नायलॉन दोरी हे साहित्य सापडले त्यांच्याविरूध्द लोणीकंद पोलीस स्टेशन गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली.
त्यांना मिळालेल्या चार दिवसांच्या पोलीस कोठडीत र त्यांच्याकडे कसून तपास केला असता अक्षय लोंढे याने त्याच्या साथीदारासह जबरी चोरीचे ७ गुन्हे  लोणीकंद, कोरेगाव पार्क, बंडगार्डन, शिवाजीनगर, स्वारगेट, भारती विदयापीठ, हडपसर या पोलीस स्टेशनमध्ये केल्याचे निष्पन्न झाले.त्यांच्याकडून जबरी चोरी केलेले ६६,५००/- रु किंमतीचे एकूण ७ मोबाईल फोन हस्तगत करण्यात आले आहेत.
         ही कामगिरी पोलीस आयुक्त पुणे शहर अमिताभ गुप्ता, पोलीस सह-आयुक्त पुणे शहर डॉ. रविंद्र शिसवे, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, रामनाथ पोकळे, पोलीस उपआयुक्त, श्रीनिवास घाडगे,
गुन्हे – २, लक्ष्मण बोराटे यांचे मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा, युनिट- ६ चे पोलीस निरीक्षक, गणेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक नरेंद्र पाटील, पोलीस उपनिरीक्षक सुधीर टेंगले, अंमलदार मच्छिंद्र वाळके, विठ्ठल खेडकर, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, नितीन शिंदे, प्रतिक लाहिगुडे, ऋषिकेश ताकवणे, ऋषिकेश व्यवहारे, सचिन पवार, ऋषिकेश टिळेकर,शेखर काटे, नितीन धाडगे, ज्योती काळे व सुहास तांबेकर यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *