पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) उरुळी कांचन येथे पुन्हा दोन टोळ्यांमध्ये गोळीबाराचा थरार यात वाळू व्यावसायिकासह हल्लेखोरही ठार झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.संतोष जगताप हा उरुळीतील हाँटेल सोनाई येथे दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चहा घेऊन बाहेर पडला त्यावेळी चार ते पाच हल्लेखोरांनी त्यांचेवर हल्ला केला त्यात त्याच्या अंगरक्षकासह तो जखमी झाला प्रत्युत्तरादाखल जगताप याने गोळीबार केला यात एक हल्लेखोराचा मृत्यू झाला या हल्ल्यात दोघे ठार तर दोन जण गंभीर जखमी झाले आहेत यामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
पुणे शहराच्या जवळ असलेल्या पुणे सोलापूर महामार्गावर उरुळी कांचन या गावात पुन्हा टोळीयुद्धाने डोके वर काढले असून आज दोन गटात समोरासमोर गोळीबार झाला अगदी सिनेमा स्टाईल झालेला या थरारानंतर परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. उरुळी हे पूर्व हवेलीतील विकसित होत असलेले व मोठया बाजारपेठेचे शहर परंतु अलीकडे या शहरास टोळीयुद्धाने ग्रासले आहे येथे नुकत्याच एका हाँटेल व्यावसायिकाच्या हत्येने हे शहर हादरले होते त्यात पोलिसांनी तत्परतेने तपास करत आरोपींना गजाआड केले परंतु पुन्हा आज दोन टोळ्यांनी एकमेकांवर गोळीबार केला भर रस्त्यात हा थरार झाल्याने व्यवसायिक घाबरून गेले आहेत.
गोळीबाराची माहिती मिळताच लोणी काळभोर पोलीस ताबडतोब घटनास्थळी पोहोचले व परिस्थितिची हाताळणी केली या गोळीबारात एक जागीच तर दुसरा दवाखान्यात उपचारासाठी नेले असता मृत्युमुखी पडला दोघे जखमी झाले आहेत त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
