पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) लोणी काळभोर येथे वास्तव्यास असलेले संतोष बधे यांनी आपल्या वडिलांच्या सायकल चा वारसा कायम राखत त्यांचीच सायकल चालवणे सुरू ठेवले असून त्यांनी नुकसान कोल्हापूर प्रवास एका दिवसात पूर्ण केला त्यांच्या या कामगिरीचा सर्वत्र गौरव होत असून पुण्याचे महापौर व आयुक्त यांनी यासाठी त्यांचा विशेष सत्कार केला आहे.
संतोष यांनी सांगितले की, ते रात्री नऊ वाजता लोणी काळभोर येथुन कोल्हापूरला जाण्यासाठी निघाले ते रात्री अकरा वाजता दिवे येथे मित्राकडे मुक्काम केला त्याच रात्री तीन वाजता उठुन व साङे तीन वाजता दिवे येथुन कोल्हापूरसाठी निघाले.सकाळी चार वाजता सासवड येथे पुरंदर सायकल क्लब या ग्रुप बरोबर कोल्हापुर साठी रवाना झाले.ग्रुप मधील सर्व सभासदांकडे आधुनिक हायब्रिड सायकल होत्या.संतोष यांच्याकडे त्यांच्या वडिलांची जुनी हरक्युलस चोवीस इंची सायकल होती.सायकलला आरमीचर असल्यामुळे प्रकाशाची सोय झाली.त्या दिव्याच्या उजेडात सासवहुन नारायणपुर मार्गे चिव्हेवाङी घाटातुन केतकावळे मार्गे कापुरहोळ येथे पोहोचले. तिथुन पुढे मुंबई बंगलोर महामार्गाने हा सर्व ग्रुप पुढे कोल्हापूर च्या दिशेने निघाला. व रात्री आठ वाजता ही मंडळी कोल्हापुर येथील महालक्ष्मी मंदिरात पोहोचली पुण्याहून कोल्हापूर पर्यंतचा प्रवास सायकल वरून केल्याचे समजल्यावर यांना श्री महालक्ष्मी मंदिरात सरळ प्रवेश देण्यात आला.
हा सायकल प्रवास अवर्णनीय व प्रेरणादायी ठरला कारण रस्त्याने जात असताना स्थानिक नागरिकांनी ठिकठिकाणी पुष्पगुच्छ देऊन या ग्रुपमधील सदस्याचे मनोबल वाढवण्यासाठी मदत केली यात एकूण ३० सदस्यांनी सहभाग घेतला होता. यामध्ये संतोष यांचे सहकारी मित्र जयसिंग गायकवाड हे सुध्दा सहभागी झाले होते.

त्यांनी केलेल्या या कामगिरी नंतर पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ,व आयुक्त विक्रम कुमार यांनी पुण्यात आयोजित प्लागेथॉन सायकल रॅलीच्या वेळी या कोल्हापूर सायकल प्रवासाबद्दल माहिती घेतली व सत्कार केला.
संतोष बधे हे लोणी काळभोर येथे वास्तव्यास असून ते पुणे म्हणाजरपालिकेत नोकरी करतात परंतु गेल्या वर्षी त्यांनी आपल्या वडिलांची जुनी सायकल त्यांचे मुळगाव आंबळे येथून आणली व दररोज पेशवे उद्यान येथे याच सायकलवर ये जा करत आहेत. त्यांच्या या संकल्पनेचे अनुकरण त्यांच्या इतर सहकाऱ्यांनी केले असून त्यांच्या वाहनताळावर सायकलींची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले.

