पुणे (हवेलीनामा ऑनलाईन)  लोकोपयोगी सेवाभावी कार्यामुळे सचिन घुले यांच्या पाठीशी हजारो लोकांचे आशिर्वादाचे हात आहेत ग्रामपंचायत, पंचायत समितीच्या माध्यमातून त्यांनी उंड्री परिसराचा विकास केला अशा नागरिकांच्या अडीअडचणीला सदैव धावून येणाऱ्या कार्यकर्ताचीच समाजाला गरज आहे असे मत आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केले.
हवेली पंचायत समितीचे माजी उपसभापती सचिन घुले यांच्या वाढदिवसानिम्मित अभिष्टचिंतन सोहळ्याचे आयोजन हांडेवाडी येथील समाधान मंगल कार्यालयात करण्यात आला होता यावेळी गौरी गणपती सजावट स्पर्धाचे पारितोषिक वितरण तसेच नवदुर्गा पुरस्काराचे वितरण करण्यात आले यामध्ये गौरीगणपती सजावट स्पर्धेतील ३५० महिलांना टीव्ही,वाँशिग मशीन,ओव्हन,फ्रिज अशी बक्षिसे देण्यात आली तसेच समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या ८१ माहिलांना नवदुर्गा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले यावेळी पुंरदरचे आमदार संजय जगताप,पुणे शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष प्रशांत जगताप,जिल्हा अध्यक्ष प्रदिप गारटकर,महिला जिल्हा अध्यक्ष भारती शेवाळे,संभाजी झेंडे,जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष दिगंभर दुर्गाडे,जिल्हा परिषद सदस्या अर्चना कामठे, माजी सरपंच श्वेता घुले, उपसरपंच नितिन घुले,योगेश कामठे, विद्या बँकेचे माजी अध्यक्ष गणेश घुले,नगरसेवाक योगेश ससाणे,गणेश ढोरे,महिला अध्यक्ष मृणालीनी वाणी,हवेली अध्यक्ष भरत झांबरे, सरपंच प्रज्ञा झांबरे,शुभदा घुले, प्रविण आबणावे,तुषार भिलारे,गणेश शेंडकर,राहुल भिंताडे,विठ्ठल होले,संतोष होले, पुणे जिल्हा राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपध्याक्ष संदीप कुंजीरआदी उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *