शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन) शिरूर पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे पिंपरखेड तालुका शिरूर या गावांमधील बँक ऑफ महाराष्ट्र या शाखेवर आज गुरुवारी दुपारी १ :३० वाजण्याच्या सुमारास चार अनोळखी चोरट्यांनी बँक अधिकारी व कर्मचाऱ्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून बँकेतील ३० ते ३५ लाख रुपयांची रोख रक्कम व जवळपास दोन कोटींची सोन्याचे दागिने जबरीने चोरून नेले असल्याची खळबळजनक घटना घडली आहे.
          हे दरोडेखोर सिल्वर रंगाच्या सियाज मोटारीतून जांबुत तालुका शिरूर यागावाकडे वेगात पळून गेलेले आहेत. पुढील तपास शिरूर पोलीस स्टेशन करीत आहेत.
         हे दरोडेखोर २५ ते ३० वयोगटातील ,५ ते ६ इसम, निळ्या रंगाची जीन्स पॅन्ट, ग्रे रंगाचे जर्किन, कानटोपी चष्मा व पायात बूट हे सिल्वर रंगाच्या मारुती सियाज गाडी पुढील बाजूस press असे लिहिलेले होते तर ते अहमदनगर दिशेला पळून गेले आहेत.शिंगवे, पारगाव ,रांजणी ,वळती ,भागडी, थोरांदळे व इतर गावातील  पोलीस पाटील यांनी याविषयीचा मेसेज आपापले गावांमध्ये इतर ग्रुपमध्ये प्रसारित करा व अशी गाडी व संशयित मिळून आल्यास अगर काही माहिती मिळाल्यास तात्काळ शिरूर पोलीस स्टेशनला कळवावे व ग्राम सुरक्षा दलाच्या मदतीने सदरची गाडी व इसम पकडून ठेवा असे आवाहन पोलिस प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *