पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) शहरातील टोळी गुन्हेगार, बेकायदेशीर धंदे करणारे, तसेच शरीर व मालाविरुध्द गुन्हे करणारे व लोकांमध्ये हदशत निर्माण करणार्या सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाई करुन त्यांचे समुळ उच्चाटन करणे याबाबत पुणे शहरातील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार यांना आदेश दिले आहेत.
यावर लोणी काळभोर पोलीस ठाणेकडील पोलीस उप-निरीक्षक गायकवाड यांना बातमी
मिळाली की, सोरतापवाडी गावात एक महिला हातभटटीची तयार दारु गाळप करीत आहे अशी माहिती मिळाल्याने याची कल्पना वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना दिली त्यांनी सोबत आवश्यक पोलीस बंदोबस्त देवुन पुढील कारवाईबाबत सुचना दिल्या. पथकाने त्या ठिकाणी छापा घातला असता एक महिला व एक
पुरष हे एका दगडी चुल्हाणावर असलेल्या लोखंडी बॅरलमध्ये कच्चे रसायन ओतीत असताना व तापलेल्या बॅरलच्या बाजुस एका काळे रंगाचे प्लॅस्टिकच्या कॅन्डमध्ये गाळुन घेत असताना दिसुन आले तेव्हा पोलीस पथकास पाहुन ती महिला व इसम पळुन गेले. तेव्हा त्या ठिकाणी असणारे मालाची पाहणी केली त्या ठिकाणी ०३ लोखंडी बॅरल, ०१ प्लॅस्टिक बॅरल, ०१ प्लॅस्टिकचे कॅन्ड, लाकडी सरपण अंदाजे २०० किलो व अंदाजे ५०० लिटर कच्चे रसायन व ३० लिटर गावठी हातभटटीची तयार दारु असा एकुण ८,८००/- रु किंमतीचा माल सापडला त्यातील आवश्यक तेवढे नमुने ठेऊन उर्वरित माल जागीच नष्ट करण्यात आला.
ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग नामदेव चव्हाण, पालीस उप-आयुक्त, परिमंडळ ०५ नम्रता पाटील, कल्याणराव विधाते, सहा पोलीस आयुक्त, हडपसर विभाग कल्याणराव विधाते, यांच्या मार्गदर्शनाखाली राजेंद्र मोकाशी, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सुभाष काळे, पोलीस निरीक्षक (गुन्हे), लाणी काळभोर पोलीस ठाणे, सहा पोलीस निरीक्षक पवार, पोलीस उप-निरीक्षक शिंदे, गोरे, गायकवाड तसच लाणा
काळभोर पोलीस ठाणेकडील सहा पो फौजदार दिवेकर, पो.हवा सुनिल शिंदे, पो.ना गायकवाड, पी.ना नागलागि, पो.शि कुदळे यांचे पथकाने केली आहे.
