पुणे (हवेलीनामा ऑनलाइन) राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी अखेर रुपाली चाकणकर यांची निवड करण्यात आली आज राज्य सरकारने अधिकृत घोषणा करत परिपत्रक काढले आहे गेली दीड वर्षांपासून हे पद रिक्त होते चाकणकार यांच्या निवडीनंतर महिलांना योग्य व त्वरित न्याय मिळण्यास मदत मिळेल अशी महिलावर्गास आहे.

        राज्यात गेल्या काही दिवसात महिला अत्याचाराच्या घटनेत वाढ होत असून यावर प्रतिबंध व्हावा अशी मागणी केली जात आहे तर राज्यात महाविकास आघाडी सत्तेत आल्यापासून राज्य महिला आयोगाचे अध्यक्षपद रिक्त होते त्यामुळे हे पद भरण्यासाठी आघाडीवर दबाव वाढत होता चित्रा वाघ यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर राष्ट्रीय कॉग्रेसच्या महिला अध्यक्षपदी रुपाली चाकणकर यांची निवड झाली त्यांनी अल्पावधीतच या पदास साजेशी भूमिका घेत विरोधकांवर जोरदार प्रहार केले.
           चाकणकर यांचा आक्रमक पवित्रा सर्वश्रुत आहे त्यात त्यांची राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी निवड झाल्याने महिला वर्गात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. समाजमाध्यमावर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी चढाओढ लागली आहे.
         चाकणकर या पदास योग्य न्याय देतील अशी सर्वच महिलांना अपेक्षा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *