सचिन जाधव
        शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन)  शिरुरमधून मोठ्या प्रमाणात कामगार वर्ग रोज रांजणगाव औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमध्ये तसेच पुणे येथे दररोज ये – जा करतो.तर शहराची बाजार पेठ मोठी असल्याने शिरुर तालुक्याशेजारी असलेल्या पारनेर व श्रीगोंदा तालुक्यातील नागरीकांची नेहमी मोठी वर्दळ असते.शाळा सुरू झाल्याने विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे.शहरात तहसिल कार्यालय, पंचायत समिती कार्यालय,नगरपरीषद, सार्वजनिक बांधकाम विभाग,पाटबंधारे विभाग,वन खाते,कृषी विभाग,दुय्यम निबंधक कार्यालय, सहाय्यक निबंधक कार्यालय, शासकीय व सहकारी बँका, पतसंस्था यांसह शासकीय कार्यालय असून शाळा, महाविद्यालय त्याचबरोबर शहराची बाजार पेठ मोठी असल्याने तीन तालुक्यांतील नागरिकांची तसेच विविध कामांनिमित्त नागरिकांची रोज ये – जा होते.सरकारी नोकरदारवर्ग,विद्यार्थी यांसह अनेकांना शिरूरला कामांनिमित्त यावे लागत असून अशावेळी मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत असल्याचे नागरीक बोलुन दाखवता आहे.त्यामुळे सध्या कारेगावपर्यंत सुरू असलेली पीएमपीएल बस सेवा पुढे शिरुरपर्यंत सुरु करावी अशी मागणी प्रवासी व नागरिकांमधुन होत आहे.
“शिरुर तालुक्यातील वाढते औद्योगिकीकरण व सुपा औद्योगिक वसाहत यांच्या मद्यवर्ती ठिकाण म्हणुन अनेक जण शिरुर शहराला पसंती देत असल्यामुळे शहरीकरणात दिवसेंदिवस वाढ होत असुन सध्या कारेगावपर्यंत सुरु असलेली पीएमपीएल बस सेवा पुढे शिरुरपर्यंत सुरु केल्यास शिक्षणासाठी तसेच नोकरीनिमित्त पुणेकडे जाणा-या व शिरुरकडे येणा-या अनेकांच्या दृष्टीने सोयीचे होईल त्याचबरोबर पीएमपीएलच्या उत्पन्नादेखील मोठी वाढ होण्यास मदत होईल”. अनिल बांडे (अध्यक्ष-शिरुर शहर प्रवासी संघ)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *