थेऊर (हवेलीनामा) गेल्या काही दिवसात पूर्व हवेलीतील गावात बिबट्याचे अस्तित्व आढळून येत आहे त्यामुळे परिसरात घाबराहत पसरलेली आहे विशेष करून त्या परिसरात शेतकऱ्यांना आपल्या शेतात उभ्या असलेल्या पिकांना पाणी देणे अवघड होते या परिसरामध्ये शेतीसाठी आठवड्यात तीन दिवस दिवसा प्रचार दिवस रात्री वीस पुरवठा केला जातो त्यामुळे रात्रीच्या वेळी बिबट्या च्या हल्ल्याची शक्यता वाढल्याने शेतातील पिकांचे नुकसान होत होते यावर हवेली पंचायत समितीचे सभापती युवराज हिरामण काकडे यांनी महावितरण अधिकाऱ्यांना एक पत्र देऊन या संदर्भात दिवसा वीज पुरवठा करावा या संदर्भात पत्र व्यवहार केला होता त्यावर महावितरण कडून सकारात्मक उपाययोजना करून शेतीसाठी दिवसा वीज उपलब्ध करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे त्यामुळे शेतकरी वर्गामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

थेऊर, नायगाव व हिंगणगाव (कृषी) फिडर अंतर्गत 12 गावांना पुन्हा दिवसा वीजपुरवठा सुरू झाला आहे. आज सोमवार सकाळी 10 वाजल्यापासुन या 3 फिडरवरील थेऊर, कोलवडी-साष्टे, नायगाव, पेठगाव, कोरेगावमुळ, भवरापूर, अष्टापुर, खामगावटेक, टिळेकरवाडी, शिरसवडी, बिवरी, नायगाव या 12 गावांना दिवसा वीजपुरवठा सुरू करण्यात आला आहे. यामुळे शेतकरी बांधवांना खरीप हंगामाच्या पूर्वसंधेला दिवसा शेतीपंप चालवता येणार आहेत. या निर्णयाबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले जात आहे.
नागरिकांच्या अडचणी दूर करण्यासाठी आपण सातत्याने प्रयत्नरत असून भविष्यात कुठलीही अडचण आली तरीही त्या दूर करण्याचा कसोशीने प्रयत्न करीन असे सभापती युवराज काकडे यांनी सांगितले.
