थेऊर (हवेलीनामा ऑनलाइन) लोणी काळभोर पोलिसांनी लोणी काळभोर हद्दीतील राइंज वस्ती जवळ जुना सोलापूर रस्ता शेजारी मुळा मुठा नदीकाठी अवैध हातभट्टी दारूवर मोठी कारवाई केली असून यात कच्या रसायनासह ३५ लिटर चे १२ कँन दारू साठा उध्वस्त केल्याची माहिती मिळाली आहे.

लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी परिसरात असलेल्या हातभट्टी दारू उत्पादनावर कारवाई करण्याची सूचना दिल्या त्यावर थेऊर पोलीस चौकीचे पोलीस हवालदार विजय जाधव यांना माहिती मिळाली की लोणी काळभोर परिसरातील राइंज वस्ती जवळ मुळा मुठा नदीकाठी  राधेश्याम हारीराम प्रजापती हा आपल्या फायद्यासाठी या परिसरात एक हातभट्टी चालवत असल्याची माहिती मिळाली त्यावर लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांना याची माहिती दिली त्यावर त्यांनी एक विशेष पथक तयार करून तेथे कारवाई करण्याची सूचना दिली मिळालेल्या माहितीनुसार त्याठिकाणी हे पथक पोहोचले असता तेथे राधेश्याम प्रजापती जमिनीत केलेल्या खड्यात प्लास्टिकच्या कागदावर हातभट्टीचे कच्चे रसायन ढवळत असल्याचे दिसून आले पोलिसांची चाहुल लागताच तो पळून गेला. पोलिसांनी तेथे धाड टाकून मोठया प्रमाणावर तयार हातभट्टी दारू व कच्चे रसायन उध्वस्त केले.

        या कारवाईत रु २०,०००/ किमतीचे कच्चे रसायन व ३५ लिटर क्षमता असलेल्या ११ कँन तयार हातभट्टी दारू रु.१४,४००/ असा माल नष्ट केला त्यातील काही तपासणी कामी जप्त केला आहे.
        ही कारवाई लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे,सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीशैल्य चिवडशेट्टी तसेच पोलीस हवालदार विजय जाधव,सुनील शिंदे,पोलीस नाईक श्रीनाथ जाधव,नागलोत व वीर या पथकाने केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *