किरण खुडे
      राजगुरुनगर (हवेलीनामा ऑनलाइन) बांधकाम व्यवसायिकाची फसवणुक करून जीवे मारण्याची धमकी देत खंडणी मागितल्याप्रकरणी रिपाईच्या (आठवले गट) खेड तालुका अध्यक्षावर गुन्हा दाखल झाला आहे. संतोष घनश्याम डोळस (वय ४४, रा. चांडोली, टोलनाक्याजवळ, ता. खेड ) असे खंडणी मागणाऱ्याचे नाव आहे. या प्रकरणी फरारी असलेल्या डोळस याला खेड पोलिसांनी अटक केली आहे.
      याबाबत सविस्तर माहिती अशी की, चांडोली (ता. खेड) येथील पुणे -नाशिक महामार्गालगत संतोष डोळस यांनी ( गट नं १२२ ) जमिन पुणे येथील बांधकाम व्यावसायिक सुदाम मटलामल नांरग व संदिप शहा यांना विकली होती. या जमिनीतील काही क्षेत्र पुन्हा माझ्या नावावर खरेदीखत करुन द्या, नाहितर मी तुमच्यावर अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करतो. तसेच जीवे मारण्याची धमकी संतोष डोळस हा बांधकाम व्यावसायिक नारंग व शहा यांना देत होता. तसेच दि. १५ / १२ / २०२० रोजी खेड पोलिस ठाण्याच्या परिसरात डोळस याची पत्नी, बहिण व इतर २० ते २२ महिला व पुरुष यांचा जमाव बोलवून सर्वच जमिन माझ्या नांवावर करून द्या. अन्यथा तुम्ही येथून जिंवत कसे जाता हे बघतो. असे म्हणून डोळस याने दोन कोटी रुपयांची मागणी नारंग व शहा यांच्याकडे करून त्यांना लाथाबुक्यांनी बेदम मारहाण करून शिवीगाळ केली. तसेच दि. १७ / १२/२०२० रोजी पुणे येथील शहा यांच्या कार्यालयात डोळस याने जाऊन जबरदस्तीने खरेदीखतावर सह्या घेतल्या. मी ज्या दिवशी सांगेल त्या दिवशी खेड निंबधक कार्यालयात गुपचुप येऊन खरेदी खतावर सह्या करायच्या अन्यथा पुढील वर्ष बघणार नाही. अशी धमकी त्याने दिली होती. नंतर दि. ३०/१२/ २०२१ रोजी नारंग यांना बोलवून घेतले. आणि तुम्हाला दिलेले धनादेश हे फक्त खरेदी खतामध्ये लिहिले आहे. हे कोणत्याही स्वरुपात वटणार नाहीत. सातबारा माझ्या नावे झाल्यावर सर्व धनादेश माझ्या समोर फाडून टाकायचे असे डोळस यांने सांगून खेड निंबधक कार्यालयात खरेदी खतावर त्यांना बळजबरीने सह्या करण्यास भाग पाडले. या प्रकरणी सुदाम मटलामल नांरग (वय ५६, रा. सोपान बाग, पुणे) यांनी संतोष डोळस याच्या विरोधात खेड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. याप्रकरणी २९ मार्च २०२१ पासून संतोष डोळस हा फरार होता. खेड पोलिसांनी डोळस यास ताब्यात घेऊन अटक केली असुन चार दिवसाची पोलिस कोठडी दिली आहे. पुढील तपास सहाय्यक पोलिस निरिक्षक राहूल लाड करित आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *