थेऊर (हवेलीनामा) महावितरण कर्मचाऱ्यांच्या कामात विसंगती कामाची टोलवाटोलवी कार्यालयाला अधिकारी नाही शेजारील गावातील अधिकाऱ्याकडे अतिरिक्त कार्यभार कर्मचाऱ्यांच्या कार्य अहवाल मागितल्यानंतरही मिळत नाही कुठल्या कर्मचाऱ्यांनी किती काम केले यासंदर्भात वरिष्ठ कार्यालयाकडून याची दखल घेतली जाणार आहे का असा नागरिकांचा सवाल आहे, अनेक नागरिकांचे फोन देखील उचलले जात नाहीत त्यामुळे नागरिकांमध्ये महावितरण बद्दल असंतोष असल्याचे दिसून येत आहे. तर अनेक महिन्यांपासून कुंजीर कॉम्प्लेक्स परिसरामध्ये वीज पुरवठ्यामध्ये सातत्याने होणारे फक्च्युएशनमुळे ग्राहकांचे हजारो रुपयांचे नुकसान होत आहे आज पर्यंत महावितरणकडून कोणालाही नुकसान भरपाई दिले नाही

या कार्यालयात असणाऱ्या तारमळा रस्त्यावरील दत्तात्रय पांडुरंग तारू यांच्या पॉलिहाऊस शेजारी उभारण्यात आलेल्या डीपी चा सांगाडा गेली कित्येक महिन्यांपासून तसाच असून या संदर्भात या शेतकऱ्याने महावितरण कार्यालयाला कळवून देखील तो सांगाडा काढण्यात आलेला नाही विशेष म्हणजे हा सांगाडा काढायचा असेल तर तुम्ही जेसीबी ची सोय करा अशी महावितरण कर्मचाऱ्यांकडून मागणी होत असते त्यातही त्यांनी या जेसीबीचा खर्च करण्याची तयारी दाखवली दिवस निश्चित केल्यानंतर त्या ठिकाणी दोन तास जेसीबी उभा राहिला परंतु महावितरणचे कर्मचारी त्या ठिकाणी त्यावेळी पोहोचले नाही त्यामुळे संबंधित शेतकऱ्याला आर्थिक फटका तर बसलाच पण तो सांगाडा काढला गेला नाही लवकरच पावसाला सुरुवात झाल्यानंतर हा सांगाडा पॉलिहाऊस वर कोसळणार त्यामुळे या शेतकऱ्याची लाखोंची नुकसान होणार आहे महावितरण ला या नुकसानीचे देणे घेणे नाही कारण आज तागायत कुठल्याही शेतकऱ्यास महावितरणने नुकसान भरपाई दिलेलीच नाही हा सांगाडा काढण्यास केवळ टाळाटाळ केली जात असल्याचे शेतकऱ्याचे म्हणणे आहे त्यामुळे या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून तो सांगाडा लवकरात लवकर काढून घ्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *