अतुल देशपांडे,

सातारा (हवेलीनामा प्रतिनिधी) मे महिन्यात पावसाने दिलेल्या हुलकावणीमुळे या महिना अखेरीस उपलब्ध आकडेवारीनुसार धरणात केवळ 10.92 टीएमसी इतकाच उपयुक्त पाणीसाठा शिल्लक राहिला आहे. लवादाने निर्धारित केलेला पाणी कोटा 29 मे रोजी संपल्याने पश्चिमेकडील वीज प्रकल्प पूर्णपणे बंद ठेवावे लागले आहेत.

या पार्श्वभूमीवर महानिर्मिती कंपनीकडून वीज प्रकल्प अखंडीत सुरू ठेवण्यासाठी पाणी कोटा वाढवून देण्याची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे. धरणातील उपलब्ध साठा पाहता या मागणीवर शासनस्तरावर लवकरच निर्णय होण्याची अपेक्षा आहे. कोयना धरणातील शिल्लक पाणीसाठ्याच्या अनुषंगाने पुढील पाणीवाटप कसे करायचे याबाबत शासन येत्या सोमवारी महत्त्वाचा निर्णय घेणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *