पुणे(हवेलीनामा) महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या वतीने मंदिर विश्वस्त बैठक उद्या रविवारी ३१ मे २०२६ रोजी सकाळी १०:३० वाजता सारसबाग गणपती मंदिर सभागृह, स्वारगेट, पुणे येथे आयोजित केली आहे या बैठकीत महाराष्ट्र शासन प्रस्तावित करत असलेला महाराष्ट्र देवस्थान इनाम निर्मूलन प्रारूप अधिनियम २०२६ रद्द करण्यात यावा याविषयी सविस्तर चर्चा विचार विनिमय होणार आहे.
या बैठकीसाठी वरिष्ठ अधिवक्ता एस. के. जैन,माजी धर्मादाय आयुक्त श्री. दिलीप देशमुख आणि श्री. सुनील घनवट, राष्ट्रीय संघटक, महाराष्ट्र मंदिर महासंघ हे उपस्थित राहणार असून ते यावर उपस्थित मंदिर देवस्थान विश्वास्ताशी चर्चा करणार आहेत.
यामध्ये अष्टविनायक गणपती मंदिर, भिमाशंकर देवस्थान, दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, मार्तंड देवस्थान जेजुरी, ग्रामदैवत कसबा गणपती, चतुःश्रृंगी मंदिर, प्रती बालाजी मंदिर केतकावळे, बनेश्वर महादेव मंदिर, म्हस्कोबा देवस्थान वीर, देवनाथ म्हस्कोबा महाराज ट्रस्ट कोडीत, श्री क्षेत्र कानिफनाथ गड देवस्थान बोपगाव, भुलेश्वर महादेव मंदिर व अन्य मंदिर विश्वस्त उपस्थित राहणार आहेत.
या बैठकीला सर्वांनी उपस्थित राहण्याची आयोजकांनी विनंती केली आहे.
