पुणे (हवेलीनामा) पुणे शहर पोलिसांमध्ये आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेल्या महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक व एका खाजगी इसमास 28 लाखाची लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगीहात पकडले त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.

लाचलुचपत प्रतिबंध विभागाने दिलेल्या प्रसिद्धीपत्रकानुसार आर्थिक गुन्हे शाखेमध्ये कार्यरत असलेल्या सहाय्यक पोलीस निरीक्षक वैशाली मुरलीधर तोटेवार, वय 49 वर्षे खाजगी इसम संभाजी शिवाजी चव्हाण, वय 47 वर्ष

थोडक्यात माहिती अशी की,यातील तक्रारदार यांनी आर्थिक गुन्हे शाखा, पुणे शहर येथे तक्रारी अर्ज दिला होता. त्याची चौकशी श्रीमती तोटेवार करत होत्या. तक्रारदार यांनी दिलेल्या अर्जामध्ये तक्रारदाराचे अर्जाची चौकशी तक्रारदार यांचे बाजूने करून त्यातील गैर अर्जदार यांच्या विरुद्ध कारवाई करून तक्रारदार यांची जमीन तक्रारदारांना परत करून देण्याकरिता तक्रारदाराकडून या पूर्वी 2 लाख रुपये रक्कम स्वीकारून आणखी 30 लाख रुपये लाचेची मागणी केली म्हणुन तक्रारदार यांनी ‘दिनांक 30/04/2026 रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे येथे तक्रार दिली होती. प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने दि. 30/04/26 रोजी पंचासमक्ष लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता, लोकसेविका ए.पी.आय. श्रीमती. वैशाली तोटेवर यांनी त्यांच्या स्वतःसाठी तक्रारदार यांच्याकडे अर्जातील तक्रारदारांचे काम करून देते या कारणासाठी या पूर्वी 2 लाख रुपये स्विकारल्याचे मान्य करून तडजोडीअंती 28 लाख रुपये लाचेची मागणी केली असल्याचे पडताळणी दरम्यान निष्पन्न झाले आहे. तसेच खाजगी इसम यांनी लाच मागणीस प्रोत्साहन दिल्याचे व लाच रक्कम स्वीकारण्याची तयारी दर्शवल्याची निष्पन्न झाले आहे.

लाच मागणी झाल्यानंतर दिनांक 02/05/2026 रोजी सापळा कारवाई केली असता लोकसेविका श्रीमती वैशाली तोटेवार यांनी पडताळणी दरम्यान खाजगी इसम संभाजी शिवाजी चव्हाण यांचे जवळ पैसे देण्यासाठी सांगितले होते त्यानुसार सापळा कारवाई आयोजित केली असता खाजगी इसम संभाजी शिवाजी चव्हाण यांनी तक्रारदारांकडून पंचासमक्ष 28,00,000/- रुपये स्वीकारले असता त्यास हॉटेल कॉनराड च्या एंट्री गेट समोर, मंगलदास रोड, पुणे येथे रंगेहात पकडण्यात आले, त्यानंतर आलोसे श्रीमती तोटेवार यांना ताब्यात घेण्यात आले असून कोरेगाव पार्क पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याप्रमाणेः गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *