थेऊर (हवेलीनामा) थेऊर ग्रामपंचायतच्या प्रवेशद्वारावर मुळा मुठा नदीकिनारी कोलवडी थेऊर दरम्यान असलेल्या पुला शेजारी दुसऱ्या गावातील काही अपप्रवृत्तीकडून गावचे सौंदर्य व आरोग्य बिघडवण्याचा मानस ठेवून कचरा टाकणाऱ्या अशा प्रवृत्तींना आज ग्रामपंचायत कडून करण्यात आलेल्या साफसफाईनंतर तरी सुबुद्धी सुचेल अशी आशा थेऊर ग्रामस्थांच्या वतीने व्यक्त करण्यात येत आहे.

थेऊर हे अष्टविनायकांपैकी एक तीर्थक्षेत्र येथे राज्याच्या विविध भागातून श्री चिंतामणी गणपती दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात या भाविकांच्या सोयी सुविधांकडे ग्रामपंचायतच्या वतीने सातत्याने लक्ष ठेवले जात असते तसेच गावात निर्माण होणारा कचरा जरा रोज घंटागाडीच्या माध्यमातून उचलला जातो परंतु दुसऱ्या गावातील कचरा काही समाज अपप्रवृत्ती असणाऱ्या कडून मुद्दाम होऊन गावच्या प्रवेशद्वारावर टाकून गावचे सौंदर्य बिघडवण्याचा प्रयत्न केला जात आहे या संदर्भात “हवेलीनामा“तून हा प्रश्न उचलण्यात आल्यानंतर थेऊर ग्रामपंचायत प्रशासनाकडून या ठिकाणची पुन्हा साफसफाई करण्यात आली व हे ठिकाण स्वच्छ करण्यात आले.

दुसऱ्या ठिकाणाहून आलेल्या ह्या कचरा गाड्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे यासाठी सर्वच प्रशासकीय यंत्रणा एकत्रित येऊन यावर उपाययोजना होणे अपेक्षित आहे भविष्यात या ठिकाणी कचरा पडणार नाही यासाठी ग्रामपंचायत पंचायत समिती जिल्हा परिषद यांच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न होतील अशी अपेक्षा आहे.

