थेऊर (हवेलीनामा) थेऊरगावच्या प्रवेशद्वारावर अनेक वेळा साफसफाई केल्यानंतर देखील काही घटकांकडून मुद्दाम होऊन कचरा टाकण्यात येत असून यावर ग्रामपंचायत कडून विशेष उपाययोजना करण्यात आली आहे या ठिकाणासाठी सीसीटीव्ही कॅमेरा ची व्यवस्था केली असून हा कॅमेरा ग्रामपंचायत व्हिजिलन्स संगणकास जोडलेला आहे.

गावच्या सौंदर्यामध्ये बाधा उत्पन्न करणाऱ्या या खोडसाळपणाला कसा घालायचा यावर अनेक तर्कवितर्क झाल्यानंतर शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाकडून या ठिकाणी सीसीटीव्ही विजिलन्स कॅमेरा बसविण्याचा निर्णय घेण्यात आला त्यानुसार आज सोमवारी या ठिकाणी हा कॅमेरा बसून तो ग्रामपंचायतीच्या संगणकास जोडण्यात आल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाकडून सांगण्यात आले.

गावामध्ये सर्वत्र स्वच्छता राखण्याचे काम ग्रामपंचायतच्या माध्यमातून होत असते त्यासाठी घंटागाडी मधून दररोज कचरा उचलला जातो परंतु काही खोडसाळपणा करणाऱ्या विकृत प्रवृत्ती ह्या गावच्या सौंदर्यास बाधा आणण्याचा प्रयत्न गेल्या अनेक दिवसांपासून करत आहेत त्यामुळे त्यांच्यावर नियंत्रण आणण्यासाठी शेवटी ग्रामपंचायत प्रशासनाकडून या ठिकाणी 24 तास निगराणी करण्यासाठी कॅमेरा बसविण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *