थेऊर (हवेलीनामा) अष्टविनायकपैकी एक तीर्थक्षेत्र असलेल्या थेऊर गावच्या सार्वजनिक जागेत काही गावाबाहेतरील नागरिकांकडून गावच्या मुख्य रस्त्यावर राडारोडा टाकून अस्वच्छता पसरवण्याचा प्रयत्न गेली कित्येक महिन्यापासून चालू आहे. थेऊर ग्रामपंचायत कडून या जागेची स्वच्छता देखील करण्यात आली परंतु या समाज विघातक प्रवृत्ती आज तागायत सुधारल्या नाहीत. त्यामुळे या अदृश्य प्रवृत्ती विरोधात कारवाई करण्यासाठी ग्रामपंचायतकडून ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे.

थेऊर ग्रामपंचायत कडून संपूर्ण गावातील गोळा होणारा कचरा उचलण्यासाठी घंटागाडीची व्यवस्था आहे त्यामुळे गावात सार्वजनिक ठिकाणी कुठेही कचरा दिसत नाही ‘संपूर्ण स्वच्छता’ अभियान राबविण्यात येत आहे. परंतु गावाबाहेरील काही शक्ती याला बाधा निर्माण करत आहेत. थेऊर कोलवडी दरम्यान असलेल्या मुळा मुठा नदीवरील पुलाशेजारी गावच्या प्रवेश द्वारावरच दुकानातील राडारोडा तसेच हॉटेल मधील उर्वरित टाकाऊ खाद्य पदार्थ अशा गोष्टी पुलाशेजारी टाकल्या जातात यावर अगोदर देखील आवाज उठविण्यात आला होता परंतु त्यावर कसलीच कारवाई होतं नसल्याने याची मुजोरी वाढत गेली आहे.

यावर थेऊर ग्रामपंचायतने कडक पावले उचलत सार्वजनिक ठिकाणी घाण टाकल्या प्रकरणी अज्ञाताच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्याची थेऊर ग्रामस्थांनी मागणी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *