पुणे (हवेलीनामा)

हडपसर येथील मगरपट्टा सिटीमध्ये विविध संस्थांच्या वतीने पहिल्यांदाच ‘भारतीय संस्कृती महोत्सव’ अत्यंत उत्साहात आणि दिमाखात पार पडला.या भव्य कार्यक्रमात सर्व वयोगटातील – लहान मुले, तरुण, प्रौढ आणि वृद्ध अशा सुमारे २००० नागरिकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. महिला आणि किशोरवयीन मुली यांचा सहभाग लक्षणीय होता.

महोत्सवामध्ये सहभागी झालेल्या सर्व संस्थांनी आध्यात्मिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रदर्शन घडवले, ज्यामुळे उपस्थित नागरिक अत्यंत उत्साही आणि श्रद्धामय झाले होते महाप्रसाद वाटपाने या भक्तिमय आणि आनंदमयी सोहळ्याची सांगता झाली .

या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे देशभरातील विविध संस्कृती आणि विचारधारेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थांचा सहभाग. यामध्ये एआय दिंडी, असांजा सिंधी पंचायत, रामसेवक समिती मगरपट्टा, हिंदू जागरण मंच, आर्ट ऑफ लिव्हिंग, इस्कॉन (ISKCON), भारतीय योग संस्थान, संस्कृत भारती, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, मगरपट्टा लोहडी समूह, हार्टफुलनेस, रिदम डिव्हाईन, मगरपट्टा छठ पूजा समूह, ब्रह्माकुमारी, बालगोकुळम, जैन श्रावक संघ, ईशा फाउंडेशन, मैत्रीबोध परिवार, मगरपट्टा मारवाडी समाज, आर्य समाज, क्षत्रिय युवक संघ, स्वदेशी जागरण मंच, मृदंग असोसिएशन, सोनार बांगला आणि योगोदा सत्संग सोसायटी यांसारख्या २५ हून अधिक संस्थांनी सहभाग नोंदवला.

मगरपट्टा रामसेवक समितीचे श्री नितीन सुखदेव शिंदे यांनी या आयोजनाबद्दल सर्व सहभागी संघटनांचे आभार मानत हा महोत्सव या परिसरात एक आदर्श उत्सव होईल अशी अपेक्षा व्यक्त केली . नितीन जी पुढे म्हणाले की उच्चभ्रू सोसायट्या मधून भारतीय परंपरांचा जागर आवश्यक आहे आणि या माध्यमातून कुटुंब प्रबोधन,पर्यावरण आणि स्वबोध जागरण घडवून भारतीय सांस्कृतिक महोत्सव मोलाचे कार्य करीत आहे. हा अभिनव उपक्रम असाच पुढे चालू राहावा आणि पुणेकरांसाठी एक आदर्श ठरावा अशी अपेक्षा व्यक्त करत सर्व आयोजक आणि सहभागी संस्था यांचे आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *