पुणे (हवेलीनामा) सोशल मीडियावर तलवारीचे स्टेटस ठेवून परिसरात दहशत पसराविणारे इसमास गुन्हे शाखेच्या युनिट दोन ने गजाआड केले.
गुन्हे शाखेच्या युनिट दोन मधील विशाल दळवी, ओंकार कुंभार, ऋषीकेश व्यवहारे हे हद्दीत वस्तीवर असताना पो हवा विशाल दळवी व पो शि ऋषिकेश व्यवहारे यांना बातमीदार मार्फत माहिती मिळाली की, सोशल मिडियावर तलवारीचे स्टेस्टस ठेवून दहशत पसरविणारा अक्षय विकास कांबळे वय 27 वर्षे रा. शांतीनगर, रामटेकडी, पुणे हा प्रथमा बिल्डिंगचे पार्किंग मधे पत्राचे शेडमध्ये, रामटेकडी, पुणे येथे तलवारीसह थांबलेला आहे अशी माहिती मिळाल्याने त्यास पथकाने ताब्यात घेवून त्याचेकडून 3500/- रू किमतीची लोखंडी पात्याची तलवार जप्त करण्यात आली आहे.
ही कामगिरी सहा.पोलीस आयुक्त गुन्हे-१ शैलेश संखे यांचे मार्गदर्शनाखाली प्रभारी पोलीस निरीक्षक अश्विनी जगताप, सहा. पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, साधना ताम्हाणे, विशाल दळवी, शंकर नेवसे, ओंकार कुंभार, ऋषीकेश व्यवहारे यांचे पथकाने केलेली आहे.
