थेऊर (हवेलीनामा) पुणे शहर पोलीस अंतर्गत असलेल्या लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील थेऊर फाटा या ठिकाणी गेली अनेक दिवसांपासून सरासपणे चालू असलेल्या मटका व जुगार अड्ड्यावर अखेर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली यामध्ये २ लाख ६७ हजार ८३० रुपयांचा माल जप्त केला.

राजेंद्र पन्हाळे वरिष्ठ पोलीस निरीक्षक लोणीकाळभोर पोलीस स्टेशन पुणे यांना मिळालेल्या माहीतीवरुन लोणीकाळभोरचे पोलीस अधिकारी अंमलदार यांनी नयन बार जवळ, थेऊर फाटा,कुंजीरवाडी येथे अवैधरित्या चालु असलेले सोरट पंतीपाकुळी व कल्याण मटका जुगार अड्ड्यावर छापा टाकुन १) सुजित हरी बोडके, वय ३६ वर्षे, रा. चिंतामणी मंदिरासमोर, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे २) करण सुरेश काळे, वय २९ वर्षे, रा. कवडी टोलनाका, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. व जुगार खेळणारे ३) विशाल गुंडाप्पा वाघमारे, वय ३० वर्षे, रा. संजु गायकवाड चाळ, माळी मळा, लोणीकाळभोर ता. हवेली, जि. पुणे. ४) सतिष दिलीप चौडकर, वय ४४ वर्षे, रा. वरचा वाडा, कुंजीरवाडी, ता. हवेली, जि. पुणे. ५) बंटी शंकर गायकवाड, वय २७ वर्षे, रा. तरवडे रायवाडी, लोणीकाळभोर, ता. हवेली, जि. पुणे. ६) मंदार सोपान हगवणे, वय ४० वर्षे, रा. खोरवडा वस्ती, सोरतापवाडी, ता. हवेली, जि. पुणे. ७) शिवाजी बारकु चव्हाण, वय ६३ वर्षे, रा. चव्हाण वस्ती, थेऊर, ता. हवेली, जि. पुणे. यांना अटक केली या कारवाईत एकुण ०२,६७,८३०/-रु चा मुद्देमाल त्यामध्ये ७,८३०/-रु रोख रक्कम, ६०,०००/-रु किं. चे ६ मोबाईल हॅन्टसेट, ०२,००,०००/-रु किं. च्या ४ मोटर सायकल व जुगाराचे साहीत्यासह असा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जुगार अड्ड्याचा मालक विकास राजुभाऊ कांबळे वय ३२ वर्षे, रा. काळेवाडी ता. हवेली जि. पुणे व इतर दोन अनोळखीचा शोध घेवुन पुढील अधिक तपास चालु आहे.

ही कारवाई श्रीमती राजलक्ष्मी शिवणकर पोलीस उप. आयुक्त परिमंडळ ६ श्रीमती अनुराधा उदमले सहा. पोलीस आयुक्त लोणी काळभोर वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोलीस उप निरीक्षक योगेश पैठणे, पोलीस हवा. संदिप जोगदंड, पोलीस अंमलदार गणेश शिंदे, प्रविण दडस, अशोक गिरी, महिला पोलीस अंमलदार माधुरी खोमणे यांनी केली.

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *