पुणे (हवेलीनामा वृतसमूह) चालकाने मालकाच्या आईचे १५ लाखाचे सोन्याचे दागिने लंपास केले परंतु विमानतळ पोलिसांनी कौशल्य पूर्ण तपास करत चालकास ताब्यात घेऊन १५ लाखाचे सोने हस्तगत केले.
फारुख अब्दुल हमीद हमदुले वय ५७ वर्ष धंदा व्यवसाय रा. डब्ल्यु ७, कोनार्क कॅम्पस, विमाननगर पुणे यांनी त्यांचे घरातील आईचे सोन्याचे दागिणे चोरी झाल्याची तक्रार विमानतळ पोलिसात दिली,
यावर वरिष्ठ पोलीस निरीक्षक गोविंद जाधव यांनी तपास पथकाचे पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड यांना तपास करण्याच्या सूचना दिल्या. तपास पथकातील पोलीस अंमलदार अंकुश जोगदंडे व लालु कन्हे यांना घरातील सोन्याचे दागिने त्यांचेकडे कामाला असलेला चालकानेच चोरी केली असल्याची माहिती मिळाली. त्याप्रमाणे चालक राजेश परशुराम कांबळे वय ४० वर्ष रा. कलवड वस्ती लोहगाव पुणे यास ताब्यात घेवुन त्याचेकडे कौशल्यपुर्ण तपास केला असता हा गुन्हा त्यानेच केल्याचे कबूल केले. चोरी केलेले १५,००,०००/- रुपये किंमतीचे दागिने वितळवुन तयार करुन घेतलेली सोन्याची लगड हस्तगत करण्यात आलेली आहे.
ही कारवाई अमितेश कुमार, पोलीस आयुक्त पुणे शहर, रंजनकुमार शर्मा, पोलीस सह आयुक्त, पुणे शहर, मनोज पाटील अपर पोलीस आयुक्त, पुर्व प्रादेशिक विभाग पुणे शहर, सोमय मुंडे, पोलीस उपायुक्त परि ०७पुणे शहर, श्रीमती नुतन पवार सहा. पोलीस आयुक्त, खराडी विभाग (अतिरीक्त चार्ज) पुणे शहर, यांचे आदेशान्वये वरिष्ठ पोलीस निरीक्षक, गोविंद जाधव, पोलीस निरीक्षक (गुन्हे) शरद शेळके विमानतळ पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक नितीन राठोड, पोलीस अंमलदार लालु क-हे, अंकुश जोगदंडे, राहुल जोशी, रुपेश पिसाळ, योगेश थोपटे, सचिन मांजरे, अंबादास चव्हाण, हरीप्रसाद पुंडे, प्रशांत सुतार, यांचे पथकाने केली आहे.
