पुणे (हवेलीनामा वृतसमूह) भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभागातील वरिष्ठ भूवैज्ञानिक व कनिष्ठ भूवैज्ञानिक २ लाखाची लाच स्विकारल्यानंतर लाच लुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले.

लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकानुसार, दिवाकर नामदेव धोटे वय 53 वर्ष, पद- वरिष्ठ भूवैज्ञानिक, नेमणूक-वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग, शिवाजी नगर पुणे आणि प्रियंका संदीपान घुले, वय 39 वर्ष, पद कनिष्ठ भूवैज्ञानिक, नेमणूक वरिष्ठ भूवैज्ञानिक भूजल सर्वेक्षण विभाग, शिवाजी नगर पुणे यांच्या विरुद्ध लाच मागणी वा स्विकारल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर माहिती अशी की,तक्रारदार हे बांधकाम व्यावसायिक असुन त्यांनी इमारतीच्या बांधकाम पुर्णत्वाचा दाखला मिळन्यासाठी PMRDA कडे अर्ज केला त्यावर PMRDA ने भुजल सर्वेक्षण अहवाल सादर करण्यास कळविले. म्हणून तक्रारदार यांनी भूजल सर्वेक्षण अहवालासाठी भूजल सर्वेक्षण विभाग पुणे यांना अर्ज केला असता, तो भुजल सर्वेक्षण अहवाल देण्यासाठी लोकसेवक घुले यांनी लोकसेवक श्री घोटे यांचेसाठी 2,50,000 रुपये लाच मागणी केली त्यावर दिनांक 22/04/2026 रोजी लाच लुचपत प्रतिबंधक विभाग, पुणे येथे तक्रार दिली.

या तक्रारीच्या अनुषंगाने दि. 22/04/26 रोजी लाच मागणी पडताळणी कारवाई केली असता, लोकसेवक श्रीमती घुले यांनी लोकसेवक श्री धोटे यांना भेटून बोलण्यास सांगितले त्यानंतर तक्रारदार हे श्री धोटे यांना भेटले असता त्यांनी पंचासमक्ष तडजोडी अंती 2,00,000/- स्विकारण्याचे मान्य करून लाचेची रक्कम श्रीमती घले यांचेकडे देण्यास सांगितले असल्याचे निष्पन्न झाले.

दिनांक 24/04/2026 रोजी सापळा करवाई करण्यात आली असता, लोकसेविका श्रीमती प्रियंका घुले यांना तक्रारदार यांचेकडून 2,00,000/- (दोन लाख) रुपये लाचेची रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले आहे. तसेच लोकसेवक श्री दिवाकर धोटे यांना देखील त्यांचे कार्यालयातून ताब्यात घेण्यात आले आहे.

ही कारवाई पोलीस उप आयुक्त/पोलीस अधीक्षक  शिरीष सरदेशपांडे, ला.प्र.वि. पुणे परिक्षेत्र, पुणे व अपर पोलीस अधीक्षक  अजीत पाटील, ला.प्र.वि. पुणे, अपर पोलीस अधीक्षक अर्जुन भोसले, ला.प्र.वि. पुणे, यांचे मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *