किरण खुडे,
राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी): खेड तालुक्यातील साबुर्डी येथील जाखलेवाडीच्या ठाकरवाडीतील गरजू नागरिकांना माऊली सेवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून कपड्यांचे मोफत वाटप करण्यात आले .
राजगुरुनगर येथील माऊली सेवा प्रतिष्ठान हे नागरिकांकडून लहानांपासून ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत जुने परंतु वापरण्यायोग्य असलेले कपडे सामाजीक भावनेतून जमा करते. त्या कपड्यांचे अंदाजे वय आणि साईज नुसार विभागणी करून ते कपडे जिथे गरज असेल तिथे वाटप केले जातात.
माऊली सेवा प्रतिष्ठानने मागील एक महिन्यात जमा केलेल्या २१ पोती कपड्यांचे वाटप खेड तालुक्यातील दुर्गम भागात असणाऱ्या साबुर्डी जवळील जाखलेवाडीत ठाकरवस्तीतील गरजु नागरिकांना केले. सुमारे दोनशे पेक्षा अधिक नागरिकांनी या उपक्रमाचा लाभ घेतला.
गरजूंना कपडे मिळाल्यानंतर आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिरात होता. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष कैलास दुधाळे, संचालक अविनाश पाटील, वासुदेव गोपाळे, चांगदेव ढमाले, संदीप होले, बाबाजी कातोरे, दिलीप राक्षे, सविता लोंढे यांनी कपडे वाटपाचे नियोजन सांभाळले.
यावेळी साबुर्डी येथील सामाजिक कार्यकर्ते शंकर खंडागळे, प्रशांत बाळासाहेब गोपाळे, शांताराम तानाजी पाषाणकर, एकनाथ मारुती पाषाणकर, रामदास पाषाणकर , सचिन वाळुंज, बबन दगडु पाषाणकर, नामदेव भोते आदी मान्यवर उपस्थित होते.
