किरण खुडे,

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशन राजगुरूनगर यांच्या वतीने प्रतिवर्षीप्रमाणे आयोजीत करण्यात आलेला दोन दिवसीय सखी मेळाव्यास नागरीकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व महिला सबलिकरण यासाठी या मेळाव्याचे आयोजन प्रतिवर्षी केले जाते. असे याविषयी संयोजकांनी सांगितले.

सखी मेळाव्यात दोन दिवस शंभरहुन अधिक स्टॉल महिलांनी लावले होते. विविध नाविन्यपुर्ण वस्तू व खाद्य पदार्थ स्टॉलवर होते. दोन दिवसात हजारो ग्राहकांनी या मेळाव्यास भेट देऊन खरेदी व खाद्य जत्रेचा आस्वाद घेतला. बालमित्रांसाठी खास खेळणी देखील असल्याने अबालवृद्धांनी यात हजेरी लावली.

राजगुरूनगरचे नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ व सर्व नगरसेवक यांच्या उपस्थितीत उदघाटन सोहळा संपन्न झाला. फाउंडेशनतर्फे सर्व नवानिर्वाचीत नगरसेवकांचा सत्कार करण्यात आला.

नागरीकांसह खेड तालुक्यातील पोलीस, राजकीय, शैक्षणिक, कला, क्रीडा, पत्रकार, डॉक्टर, वकील इत्यादी क्षेत्रातील मान्यवरांनी देखील उपस्थिती लावली.

कार्यक्रमाचे संयोजन हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष बाळासाहेब सांडभोर, उपाध्यक्ष नाजनीन शेख, सचिव अमर टाटिया, सहसचिव शिल्पा बुरसे, कार्याध्यक्ष मीनाक्षी पाटोळे तसेंच संचालक डॉ. नीलम गायकवाड, मनीषा पवळे, दिलीप होले, सचिन वाळुंज, सुनील वाळुंज, संतोष सांडभोर , डॉ. वंदना शेवाळे, मधुकर गिलबिले, संगीता तनपुरे, राजन जांभळे, उत्तम राक्षे, दत्ता रुके, राहुल मलघे, आकाश बोंबले, प्रियांका शिंदे, राहुल वाळुंज, शिल्पा बुरसे, संपदा सांडभोर यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मीनाक्षी पाटोळे, प्रास्ताविक मनीषा पवळे, आभार नाजनीन शेख यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *