किरण खुडे

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील कांतिवीर हुतात्मा शिवराम हरी राजगुरू, भगतसिंग, सुखदेव यांच्या ९५ व्या स्मृतिदिनामित राजगुरूनगर येथे अभिवादन कार्यक्रम झाला.

येथील राजगुरूनगर एसटी बसस्थानक आवारातील हुतात्मा राजगुरु, भगतसिंग व सुखदेव यांच्या स्मृती शिल्पांना विविध क्षेत्रातील मान्यवरांनी पुष्पहार अर्पण करित अभिवादन केले. यावेळी पुणे जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील, खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष ॲड. देवेंद्र बुट्टे पाटील, बाजार समितीचे सभापती तथा जिल्हा परिषद सदस्य विजयसिंह शिंदे पाटील, पंचायत समितीच्या सभापती विद्या मोहिते, उपसभापती मंगेश सांवत, दिलीप डुबे, राजगुरुनगर सहकारी बॅकेचे अध्यक्ष सागर पाटोळे, संचालक विजयाताई शिंदे, विनायक घुमटकर, मुकुंद आवटे, राजगुरू प्रतिष्ठानचे अध्यक्ष कोंडीभाऊ टाकळकर, बाळासाहेब सांडभोर, सुभाष होले, रेखाताई श्रोत्रिय, सुदाम कराळे बाजार समितीचे संचालक सयाजी मोहिते, वैभव नाईकरे आदी मान्यवर उपस्थित होते.

दरम्यान आमदार बाबाजी काळे, माजी आमदार दिलीप मोहिते यांनी हुतात्म्यांच्या शिल्पांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. हुतात्मा राजगुरू यांचे जन्मस्थान असलेल्या राजगुरू वाड्यावर अभिवादन कार्यक्रम झाला. पोलीस निरीक्षक सुभाष चव्हाण यांच्या हस्ते वाड्यावर ध्वजारोहण झाले. यावेळी प्रांताधिकारी अनिल दौंडे, जिल्हा परिषद सदस्या दिप्ती भोगाडे, तनुजा घनवट, नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ, उपनगराध्यक्ष मनोहर सांडभोर, राजगुरू स्मारक समितीचे अध्यक्ष अतुल देशमुख, सुशील मांजरे, नरेंद्र गायकवाड, शैलेश रावळ, संदिप वाळूंज, नितिन शहा, स्व. बाळासाहेब आपटे स्मृती समितीचे स्वानंद खेडकर यावेळी उपस्थित होते. राजगुरुवाड्यात दिवसभर रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. नगरपरिषदेच्या वतीने गेले तीन दिवस विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन केले. तसेच हुतात्मा राजगुरू महाविद्यालय परिसरातील हुतात्मा स्मारक, राजगुरुनगर सहकारी बँकेत हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले.

 

दर्जेदार विकासासाठी कटिबद्ध

 

हुतात्मा शिवराम हरी राजगुरू स्मारक आणि परिसर विकास पुढील पिढ्यांच्या प्रेरणेशी जोडलेला विषय आहे. या स्मारकाचा सर्वांगीण विकास होणे म्हणजे येणाऱ्या पिढ्यांना आपल्या स्वातंत्र्यलढ्याची जाणीव करून देणे आणि राष्ट्रप्रेमाची भावना दृढ करणे होय. निधी मिळावा आणि स्मारकाचा दर्जेदार विकास व्हावा यासाठी मी कटिबद्ध आहे.

– बाबाजी काळे (आमदार ,खेड आळंदी. )

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *