शिरूर (हवेलीनामा ऑनलाइन)
       निनावी पत्राव्दारे शिरुर-हवेलीचे आमदार अशोक रावसाहेब पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यावर कायदेशिर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे शिरुर तालुकाध्यक्ष रविंद्र काळे यांनी शिरुरचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांना निवेदन देऊन केली.
        यावेळी शिरुर शहर विकास आघाडीचे अध्यक्ष सुभाष पवार, राष्ट्रवादी चे शहराध्यक्ष मुजफ्फर कुरेशी,शिवसेनेचे शहरप्रमुख मयुर थोरात,काॅंग्रसचे शहराध्यक्ष किरण आंबेकर, वंचित बहुजन आघाडीचे पुणे जिल्हाध्यक्ष विनोद भालेराव, मनसेचे उपजिल्हाध्यक्ष महिबुब सय्यद, जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र जगदाळे, आरपीआयचे शहराध्यक्ष निलेश जाधव,मनविसेचे तालुकाध्यक्ष स्वप्निल माळवे, राष्ट्रवादी युवकचे रंजन झांबरे,मनसेचे शहराध्यक्ष अविनाश घोगरे, राष्ट्रवादी महिला आघाडीच्या तालुकाध्यक्षा विद्या भुजबळ,युवती तालुकाध्यक्षा संगीता शेवाळे, शहराध्यक्षा सौदामिनी शेटे, मृणाल कर्डिले यांसह सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
          देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रविवार दि.१७ रोजी शिरुरमधील काही लोकांना एक निनावी पत्र आलेले असून सदर पत्रात शिरुर-हवेलीचे आमदार अशोक रावसाहेब पवार यांची व त्यांच्या पत्नी व पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या सुजाता अशोक पवार यांची बदनामी करुन शिरुर हवेलीचे आमदार अशोक रावसाहेब पवार यांचा “महेंद्र मल्लाव करु’ अशा प्रकारची जीवे मारण्याची गर्भित धमकी दिलेली आहे. त्यामुळे शिरुर हवेलीचे आमदार अशोक पवार यांचे जिवीतास धोका निर्माण झालेला आहे.तसेच सदर पत्रात काही नगरसेवक व इतर काही मान्यवर लोकांची देखील बदनामी केलेली आहे.त्यामुळे शिरुर शहरात दहशतीचे वातावरण झाले असून त्या निनावी पत्र लिहिणा-यांचा योग्य प्रकारे तपास करुन त्यांचेवर कायदेशिर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *