लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन)  युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या संकल्पनेतून “माझी वसुंधरा” या अभियानाअंतर्गत तसेच युवा सेनेच्या अकराव्या वर्धापनदिनानिमित्त विविध ठिकाणी वृक्षारोपण संपन्न झाले.
  या कार्यक्रमांतर्गत वाघोली, भावडी, तुळापूर, फुलगाव, तरडे, थेऊर, लोणी काळभोर, कदमवाक वस्ती, उरुळी कांचन, अशा विविध ठिकाणी मंदिर परिसर,क्रीडांगण येथे युवासेना सहसचिव व युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या नेतृत्वाखाली दिवसभरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपणाचा कार्यक्रम झाला.
   यावेळी  विशाल सातव (सहसचिव युवासेना. महा.राज्य), प्रकाश लोले(सचिव हवेली यु.सेना.)ओंकार तुपे, संदीप तांबे (अध्यक्ष जय भैरवनाथ तरुण मंडळ भावडी), मंगेश चव्हाण, कुलदीप तांबे, संदीप पुणेकर,भाऊसाहेब हंडगर,
 किशोर पाटोळे,अनिल शिंदे, राहुल मगर,अजय मोरे, श्रेयश वलटे,सचिन कांचन,  प्रताप कांचन, पंकज जगताप ,ओंकार तुपे, कुमार शिवले यांच्यासह युवा सेनेचे पदाधिकारी व तरुण कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *