लोणी काळभोर (हवेलीनामा ऑनलाइन) लोणी काळभोर पोलिसांनी रोहित्र चोरणाऱ्या टोळीला गजाआड करत तब्बल रु ८० हजार च्या १०१ किलो तांब्याच्या तारा हस्तगत केले आहे.
लोणी काळभोरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणी काळभोर चे तपास प्रमुख यांना एका बातमीदाराकडून माहिती मिळाली की महावितरण च्या रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणारे दोघे जण कदमवाकवस्ती परिसरात तारा विकण्यासाठी येणार आहेत याची माहिती वरिष्ठांना देऊन पोलीस हवालदार गायकवाड व पोलीस नाईक नागलोत यांना कारवाई करण्याची सूचना केली त्यानुसार त्यांनी कदमवाकवस्ती परिसरात दोन व्यक्ती संशयास्पद फिरताना आढळून आले.त्यांना ताब्यात घेऊन त्यांची माहिती घेतली असता १)अमित उर्फ काल्या बजरंग चव्हाण रा.खेडशिवापुर,व २)सागर विलास पवार रा खेडशिवापुर ता हवेली मूळ रा.इंदिरानगर कुडाळ ता जावळी,जि सातारा.अशी त्यांनी नावे सांगितले.
त्यांच्याकडे अधिक चौकशी केली सुरुवातीला त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली परंतु पोलीस स्टेशनमध्ये त्यांची चौकशी केली त्यावर त्यांनी लोणी पोलीस स्टेशन परिसरात रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरल्याचे कबूल केले. त्यांच्याकडे रु.८० हजार च्या १०१ किलो तांब्याच्या तारा हस्तगत केल्या.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी, पोलीस निरीक्षक सुभाष काळे यांच्या मार्गदर्शनाखाली, सहाय्यक पोलीस निरीक्षक राजू महानोर,पोलीस उपनिरीक्षक प्रमोद हंबीर,पोलीस हवालदार नितीन गायकवाड, पोलीस नाईक सुनील नागलोत, अमित साळुंखे,श्रीनाथ जाधव, संभाजी देवकर, पोलीस शिपाई बाजीराव वीर,निखिल पवार, शैलेश कुदळे,राजेश दराडे,दिगंबर साळुंखे या पथकाने केली
