किरण खुडे

राजगुरूनगर : (हवेलीनामा प्रतिनिधी) : शहराजवळील ढोरे भांबुरवाडी (ता. खेड) येथे जमीनीच्या वादातून झालेल्या मारहाणीत ७५ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. ३) घडली. या घटनेत सोपान तुकाराम भांबुरे (वय ७५) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी त्यांच्या पत्नीने खेड पोलीस ठाण्यात पाच जणांविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.

शिवाजी पांडूरंग भांबुरे, किरण शिवाजी भांबुरे, आशा सुभाष भांबुरे, सोनाली किरण भांबुरे, अरुणा शिवाजी भांबुरे (सर्व रा. ढोरे भांबुरवाडी, ता. खेड) या संशयीतांच्या विरोधात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मृत सोपान तुकाराम भांबुरे हे त्यांच्या पत्नी चंद्रकला यांच्यासह दुपारी सुमारे पावणेचार वाजता त्यांच्या ‘दरा’ भागातील शेतात काम करत होते. तेव्हा त्यांचा मुलगा रामदास भांबुरे गहू घरी नेण्यासाठी शेतात आला होता.

यावेळी भावकीतील लोकांनी शेतात येऊन संगनमताने “तुम्ही या शेतात यायचे नाही” असे म्हणत शिवीगाळ आणि दमदाटी केली. त्यानंतर संशयीतांनी सोपान भांबुरे आणि त्यांच्या पत्नीला हाताने, लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. मृत सोपान भांबुरे या मारहाणीत जमिनीवर कोसळले. खाली पडल्यानंतरही त्यांनी त्यांच्या छातीवर लाथा-बुक्क्यांनी मारहाण केली. मारहाणीनंतर सोपान भांबुरे यांना चक्कर आल्याने त्यांना खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *