पुणे (हवेलीनामा वृतसमूह) लाभार्थ्याचे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य करण्यासाठी दाखल प्रकरण विभागीय कार्यालयाकडे पाठविण्यासाठी जिल्हा व्यवस्थापक आणि सहाय्यक लेखा अधिकारी यांनी 20 हजार रुपयाचे लाच मागितली व 15 हजाराची लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात अडकले.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात,1) महेंद्र मलेशा माने वय 56 पद जिल्हा व्यवस्थापक, महात्मा फुले, मागासवर्गीय विकास महामंडळ, पुणेआणि 2) संतोष नामदेव शिंदे वय 55 पद सहाय्यक लेखा अधिकारी यांना लाच स्विकारल्या प्रकरणी ताब्यात घेण्यात आले आहे.
थोडक्यात हकीकत अशी कीं, तक्रारदार हे एक फोटोग्राफर असून त्यांनी त्यांच्या फोटोग्राफी व्यवसायाकरीता आवश्यक असणारा 3,08,990/- रुपये किमतीचा कॅमेरा खरेदी करण्यासाठी कॅनरा बँकेमध्ये कर्ज प्रकरण केला. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडून मागासवर्गीय लोकांना व्यवसायासाठी 50 हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येत असते म्हणून तक्रारदाराने त्यांच्या फोटोग्राफी व्यवसायकरता लागणा-या कॅमेरा खरेदीसाठी 50 हजार रुपयाचे अनुदान मिळावे म्हणून त्यांनी महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळाकडे सप्टेंबर 2025 मध्ये रीतसर प्रकरण दाखल केले आहे.
यातील लोकसेवक महेंद्र माने हे महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ पुणे येथे जिल्हा व्यवस्थापक व लोकसेवक संतोष शिंदे हे सहाय्यक लेखा अधिकारी म्हणून नोकरीस असून महामंडळाकडे लाथार्थ्यांनी दाखल केलेल्या प्रकरणांमध्ये गृहभेट करून लार्भार्थ्यांकडून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून घेऊन महिंद्र माने यांच्या शिफारशीनंतर ते प्रकरण अनुदान मंजुरीसाठी महामंडळाच्या विभागीय कार्यालयात पाठविण्याचे काम करतात.
वरील दोन्ही लोकसेवकांनी तक्रारदाराने दाखल केलेल्या अनुदानाचे प्रकरण सकारात्मक शिफारशीसह महात्मा फुले मागासवर्गीय महामंडळाच्या विभागीय कार्यालयात पाठविण्यासाठी तक्रारदाराकडे 20 हजार रुपयाच्या लाचेची मागणी केल्याची तक्रार तक्रारदाराने दिनांक 30 जानेवारी 2026 रोजी अँटी करप्शन ब्यूरो, पुणे येथे दिली होती.
त्यांच्या तक्रारीनुसार दिनांक 04/02/2026 व 05/02/2026 रोजी पडताळणी कारवाई केली असता नमुद दोन्ही लोकसेवक यांनी तक्रारदार यांचे अर्जाप्रमाणे त्यांच्या अनुदानाची फाईल सकारात्मक शेरा मारून महामंडळाचे विभागीय कार्यालयात पाठविण्यासाठी तडजोडीअंती 15,000/- रुपयाची लाच मागणी केल्याचे निष्पन्न झाले.दि. 05/03/2026 रोजी करण्यात आलेल्या सापळा कारवाईदरम्यान संतोष शिंदे यांनी 19:07 वाजता तक्रारदार यांचेकडून पुणे कॅफे समोर, अपोलो चौक, रस्ता पेठ येथे 15,000/- रुपये लाच रक्कम स्वीकारताना रंगेहात पकडण्यात आले. असून त्यानंतर लोकसेवक महेंद्र माने यांना त्यांच्या राहत्या ठिकाणावरून 20:38 वाजता ताब्यात घेण्यात आले आहे.
यातील लोकसेवक महेंद्र मलेशा माने याच्याविरुद्ध सदर बाजार पोलीस ठाणे, सोलापूर शहर पोलीस आयुक्तालय, येथे अगोदरच एक भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
