पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) पुणे जिल्ह्यातील रांजणगाव परिसरात छापा टाकून एका बांगलादेशी तरुणीला ताब्यात घेतले.

पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाला एक बांगलादेशी तरुणी पुणे जिल्ह्यात रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशन हद्दीत कारेगाव येथे तिची ओळख लपवून बनावट नावाने राहत असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे एटीएस पथकाने वेषांतर करुन कारेगाव येथील आजूबाजूचे लोकांकडून माहिती काढून सदर तरुणीचा ठावठिकाणा शोधला. रांजणगाव पोलीसांचे मदतीने सदर संशयित महिलेच्या घरावर छापा टाकून ताब्यात घेतले. ती बांगलादेश येथील तिचे नातेवाईक यांचे संपर्कात असल्याचेही चौकशीत निष्पन्न झालेले आहे.

बांगलादेशीत तरुणी भारतात कशी आली? ती यापूर्वी कोठे राहिली तसेच तिला बेकायदेशीर राहणेसाठी कोणी मदत केली याबाबत अधिक तपास चालू असून तिला बेकायदेशीरपणे राहण्यास मदत करणारे यांच्यावरही कारवाई करण्यात येणार आहे.

बांगलादेशी तरुपीला पुढील कारवाईसाठी रांजणगाव पोलीस स्टेशनचे ताब्यात देण्यात आलेले असून पुढील अधिक तपास रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे करीत आहेत.

ही कारवाई पुणे जिल्हा पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्या मार्गदर्शना खाली दहशतवाद विरोधी शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश पवार, सहा पोलीस उपनिरीक्षक महेश गायकवाड, विशाल गव्हाणे, पोलीस हवालदार निलेश कदम, विशाल भोरडे, रवींद्र जाधव, ओंकार शिंदे, गणेश चंदनशिव, महिला पोलीस शिपाई आर.डी. भोजने यांचे पथकाने केलेली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *