पुणे (हवेलीनामा वृतसमूह) समाजामध्ये आजही लिंगभेद करणाऱ्याची कमी झालेली नाही त्यामुळेच बेकायदेशीररित्या गर्भलिंगनिदान करणाऱ्यांचे जाळे पुन्हा दाट होत असल्याचे दिसत आहे, शासनाकडून अतिशय कडक वा परिणामकारक कारवाई सातत्याने झाली पाहिजे. अशाच प्रकारचे बेकायदेशीर गर्भलिंग तपासणी करणारी टोळी पुणे पोलिसांनी गजाआड केली.

गुन्हे शाखा युनिट ७ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे व पथक आणि जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागनाथ येम्पल्ले, जिल्हा पुणे, सचिन धस, वैदयकीय अधिक्षक, ग्रामीण रूग्णालय, शिरूर पुणे व सोबत पंचांना घेऊन एजंट नरेंद्र ठाकरे, रा केसनंद याने दिलेल्या माहिती प्रमाणे डमी पेशंट सह खाजगी व सरकारी वाहनाने कारेगाव, रांजणगाव एमआयडीसी येथे गेले असता तेथे एजंट नरेंद्र ठाकरे याने डमी पेशंट व तिचे पती यांना आपले खाजगी गाडी मध्ये घेऊन जावुन लाईफ केअर क्लिनिक, पाचंगे वस्ती, ढोकसांगवी, रांजणगाव येथे आणले. प्राप्त लाईव्ह लोकेशन प्रमाणे सर्व स्टाफने पंचांसह लाईफ केअर क्लिनिक येथे छापा टाकुन कारवाई केली असता आरोपी इसम नामे आकाश सुभाष मलगुंडे, वय ३५ वर्षे, रा. धनगरवाडा, ढोकसंगवी, ता. शिरूर, जि. पुणे हा डमी महिला पेशंट हिची छोटया प्रोब जो मोबाईल ला वायफाय ने कनेक्ट करून मोबाईल अॅप द्वारे सोनोग्राफी करताना मिळुन आला. त्याचे सोबत एजंट नरेंद्र साहेबराव ठाकरे वय ५२ वर्षे, रा. ग्रामपंचायत जवळ, केसनंद गाव, समर्थ पार्क, ता. हवेली, जि. पुणे हा मिळून आला असुन सदर क्लिनिक मध्ये व एजंट चे गाडीमध्ये गर्भलिंगनिदान करण्याचे साहित्य व गर्भपात करण्यासाठी उपयोगात येणारे औषधे मिळुन आली आहेत. सरकारी पंच, सिव्हिल सर्जन, स्थानिक वैदयकीय अधिकारी यांचेसह पंचनामा कारवाई करण्यात आली असुन सदर कारवाईमध्ये वॅगनार गाडी, गर्भलिंगनिदान करण्याचे साहित्य व गर्भपात करण्यासाठी उपयोगात येणारे औषधे असा एकुण ७,७३,०७५/-रू.कि.चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. सदर बाबत वाघोली पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही सुरु आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त, पुणे शहर अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे) पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा. पोलीस आयुक्त (गुन्हे) राजेंद्र मुळीक गुन्हे शाखा, यांचे मार्गदर्शनाखाली युनिट -७चे पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे यांचे सुचनेप्रमाणे गुन्हे शाखा, युनिट ७ कडील सहा. पोलीस निरीक्षक मदन कांबळे, पोलीस अंमलदार सारंग दळे, गिरीष नाणेकर, ऋषीकेश ताकवणे, सुहास तांबेकर, प्रशांत कापुरे, निलेश साळवे, निर्णय लांडे, विनायक साळवे, नितिन धाडगे, बाळासाहेब तनपुरे व भरत गुंडवाड, तसेच महिला पोलीस अंमलदार नेहा तापकीर, प्रतिक्षा पानसरे, सोनाली नरवडे व कीर्ती मांदळे यांनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *