पुणे (हवेलीनामा वृतसमूह) पुणे शहर शहर आयुक्तालया अंतर्गत असलेल्या पोलीस स्टेशन परिसरातील सर्व वाहन चालक यांनी आपल्या वाहनावर असलेल्या वाहतूक नियम लंगधनाच्या कारवाईचा दंड एका महिन्याच्या आत भरला नाही तर वाहन चालक परवाना रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल तसेच अशा वाहन चालकांवर न्यायालयीन कारवाई करण्यात येणार असल्याचे पुणे शहर पोलीस वाहतूक उपायुक्त हिम्मत जाधव यांनी नुकतेच जाहीर केले आहे.

पुणे शहरांमध्ये वाहन चालकांकडून विशेषतः दुचाकी वाहन चालकांकडून वाहतूक नियमांच्या कडे दुर्लक्ष करून सर्रास नियमांचे उल्लंघन केले जाते यावर वाहतूक पोलिसांकडून ऑनलाईन दंडाची कारवाई केली जाते परंतु बहुतेक वाहन चालक अशा आपल्या वाहनावर लादण्यात आलेल्या दंडाकडे दुर्लक्ष करून तो दंड भरण्याची मानसिकता त्यांच्यात नसते परंतु पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत असलेल्या वाहतूक विभागाचे उपायुक्त जाधव यांनी नुकतेच जाहीर केले आहे की दि. २६ फेब्रुवारी ते 2 मार्च दरम्यान अशा वाहन चालकांना त्यांच्या वाहनावरील असलेल्या दंडाची नोटीस पाठविण्यात येणार असून अशा वाहन चालकांनी त्यांच्या वाहनावर आकारण्यात आलेल्या दंड 30 दिवसाच्या आत भरला नाही तर अशा वाहन चालकाचे वाहन चालक परवाने रद्द करण्यात येणार असून त्यांच्यावर न्यायालयीन खटला भरला जाईल.

वाहतूक पोलिसांकडून अशा प्रकारचे आवाहन केल्यानंतर वाहन चालकांना दंड भरावाच लागणार आहे आर्थिक वर्ष संपत आल्याने ही दंडाची कारवाई तीव्र करण्यात आल्याचे दिसून येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *