पुणे (हवेलीनामा वृतसमूह) महाराष्ट्र शासनाने राज्यात गुटखा व पान मसाला विक्रीवर प्रतिबंधात आदेश जारी केला असल्याने राज्यात गुटखा व पान मसाला विक्रीवर गेली अनेक वर्षांपासून प्रतिबंध आहे परंतु या प्रतिबंधाकडे सर्रासपणे दुर्लक्ष करून सर्रासपणे सर्वत्र मोठ्या प्रमाणावर गुटख्याची विक्री केली जात आहे यावर अन्न व औषध प्रशासनाकडून केवळ तटपुंजी कारवाया केल्या जात आहेत अशाच प्रकारची एक कार्यवाही लोणी काळभोर पोलीस स्टेशन परिसरात  एका गुटखा व्यवसायिकावर ही कारवाई करण्यात आली खरे तर प्रत्येक पान टपऱ्यांवर सर्रासपणे व मुक्तपणे हा गुटखा विकला जातो केवळ एक आणि दोन गुटखा विक्रेत्यावर कारवाई करून यावर प्रतिबंध बसणार का हा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे.

गेल्या काही महिन्यापूर्वी लोणी काळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील एका वस्तीवर गुटखा निर्मितीचा कारखाना उघडकीस आला यातील संबंधितांना पोलिसांनी गजाआड केले परंतु त्यांच्यावर मोठी कारवाई होण्याची अपेक्षा सर्वसामान्य नागरिकाला होती कारण राज्य सरकारने विधानसभेमध्ये अशा प्रकारच्या गुटखा व्यावसायिकांवर मकोका अंतर्गत कार्यवाही करणार अशा प्रकारचे माहिती दिली होती परंतु यात आतापर्यंत किती जणांना अशा प्रकारच्या कार्यवाहीची शिफारस करण्यात आली हा प्रश्न अनोत्तरीत आहे.

पुणे सोलापूर महामार्गावर असलेल्या बहुतांश गावांमधील लहान मोठ्या सर्वच पान विक्रेत्या टपऱ्यांमधून सर्रासपणे सहज असा हा गुटखा उपलब्ध होतो याकडे संबंधित विभाग अक्षरशः डोळेझाकपणा करत असल्याने तरुणांचे आरोग्य धोक्यात आले आहे व हा तरुण व्यसनाधीन होताना दिसतो आहे यातील गंभीर बाब म्हणजे अगदी लहान वयात देखील मुले या गुटक्याच्या आहारी जाताना दिसून येत आहेत त्यामुळे याकडे शासनाने गांभीर्याने पाहून गुटखा विक्रेत्यांबरोबर याची संबंधित असणारे सर्व यंत्रणा उध्वस्त करण्याची गरज आहे केवळ एका दुसरी कारवाई करून यातून काहीही साध्य होणार नाही अशी प्रतिक्रिया ऐकावयास येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *