भीमाशंकर (हवेलीनामा ऑनलाइन)  गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या प्रयत्नाने श्रीक्षेत्र भीमाशंकर देवस्थान परिसरातील कामांसाठी १३ कोटी ८२ लाख ९९ हजार रुपये तसेच आंबेगाव – शिरूर विधानसभा मतदारसंघातील कामांसाठी ६ कोटी ४२ लाख ९५ हजार रुपयांच्या कामांना मान्यता देण्यात आल्याची माहिती आंबेगाव तालुका पंचायत समितीचे सभापती संजय गवारी यांनी दिली.
          श्री क्षेत्र भीमाशंकर परिसर विकास आराखडा १४८ कोटी रुपयांचा मंजूर झाला असून, या अंतर्गत विविध कामे सुध्या सुरू आहेत. देवस्थान परिसरातील पायरी मार्ग, त्यावरील छत व प्रवेशद्वार नव्याने बांधणे, यासाठी १३ कोटी ८२ लाख ९९ हजार रुपयांच्या कामास मंजुरी देण्यात आली आहे. लवकरच निविदा प्रक्रिया होऊन कामास सुरुवात होणार आहे.
           आंबेगाव-शिरूर विधानसभा मतदारसंघातील शिरूर तालुक्यातील वरुडे, चिचोली ते कान्हूर मेसाई चिचोली १४२ किलोमीटर २ ची सुधारणा करण्यासाठी १ कोटी १९ लाख ४१ हजार ५९४ रुपये, आमदाबाद फाटा ते वाघाळे ग्रामीण मार्ग ६३ किलोमीटर ०० ते ०९ रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ४ कोटी ३५ लाख २४ हजार ६१९ रुपये, निमगाव भोगी व सोनसांगवी १४६ किलोमीटर १/५०० ते २/५०० रस्त्याची सुधारणा करण्यासाठी ८८ लाख २९ हजार ३७८ रुपये, अशा एकूण रक्कम ६ कोटी ४२ लाख ९५ हजार ५९९ रुपयांच्या कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *