किरण खुडे

राजगुरूनगर (हवेलीनामा प्रतिनिधी) : गर्दीचा फायदा घेत वृद्ध महिलेच्या हातातील सुमारे ६८ हजार रुपयांच्या सोन्याच्या बांगडीची चोरी झाल्याची घटना राजगुरूनगर एसटी बसस्थानकावर घडली. या प्रकरणी खेड पोलीस स्टेशन येथे गु.र.नं. १११/२०२६ भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) अन्वये अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

खेड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी या ६६ वर्षीय गृहीणी असून त्या शिरोली (ता. खेड) येथील रहिवासी आहेत. सायंकाळी सुमारे ५.०० वाजण्याच्या सुमारास त्या राजगुरूनगर येथील एसटी बसस्थानकावरून साबुर्डी गाडीत बसण्यासाठी आल्या होत्या.

बसस्थानकावर मोठी गर्दी असल्याने त्या दोन पिशव्या हातात घेऊन बसमध्ये चढत असताना अज्ञात व्यक्तीने गर्दीचा फायदा घेत त्यांच्या हातातील सोन्याची बांगडी धारदार वस्तूने कापून चोरी केली. ही बांगडी स्वस्तिक व चौकोनी डिझाईन असलेली असून सन २००८ मध्ये बनविलेली असल्याचे फिर्यादीत नमूद आहे. चोरी गेलेल्या दागिन्याची किंमत सुमारे ६७,७४० रुपये इतकी आहे.

बसमध्ये चढल्यानंतर काही वेळाने हात हलका वाटल्याने संबंधित महिलेला या प्रकाराची जाणीव झाली. मात्र तोपर्यंत अज्ञात चोरटा गर्दीतून पसार झाला होता.

या घटनेनंतर संबंधित महिलेने खेड पोलीस स्टेशनमध्ये धाव घेऊन तक्रार दिली. त्यानुसार भारतीय न्याय संहिता कलम ३०३(२) प्रमाणे अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुढील तपास पोलीस हवालदार सुरू असून पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहे.

दरम्यान, राजगुरूनगर एसटी बसस्थानक परिसरात गर्दीच्या वेळी महिलांच्या दागिन्यांवर डोळा ठेवून चोऱ्या होत असल्याने नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *