किरण खुडे
राजगुरुनगर :(हवेलीनामा प्रतिनिधी) : येथील राजगुरूनगर एसटी बसस्थानक व एसटी आगारात कर्मचाऱ्यांच्या वतीने शिवजयंती साजरी करण्यात आली. यावेळी आगार व्यवस्थापक उज्वला कुटे आणि सहायक वाहतूक निरीक्षक नासिर हवालदार, कार्यशाळा अधिक्षक अनंत कुंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
शिवजयंतीनिमित्त किर्तनकार ह.भ.प. संस्कृती पवार यांनी शिवरायांच्या जीवनावर प्रबोधनपर व्याख्यान दिले. त्यांच्या व्याख्यानाने उपस्थित एस टी कर्मचारी व प्रवासी मंत्रमुग्ध झाले होते. आगार व्यवस्थापक उज्वला कुटे व दिपाली बोंबले यांची समायोजित भाषणे झाली. त्यानंतर शिवरायांची सामुहिक आरती करण्यात आली. बसस्थानकावर दिवसभर शिवज्योत प्रज्वलित ठेवण्यात आली होती. कर्मचाऱ्यांनी परिधान केलेले भगवे पोशाख उपस्थितांचे लक्ष वेधून घेत होते. ध्वनीक्षेपकावरून लावलेले पोवाडे व देशभक्तीपर गीते व वयोवृद्ध प्रवासी भोसले यांच्या पोवाड्याने वातावरण भारून टाकले होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी तर आभारप्रदर्शन दत्तात्रय गभाले यांनी केले.
कार्यक्रमाचे संयोजन आगारव्यवस्थापक उज्वला कुटे, दत्तात्रय गभाले, हिरामण दिघे, गुलाब तिटकारे, प्रकाश राठोड, रविंद्र राठोड, अमित जगताप, अजिंक्य फलके, निलेश सातकर, माणिक थिगळे, राजेंद्र देवरे, अर्जुन वाघुले, गजानन सांडभोर, स्नेहा कातोरे, विष्णू राठोड, ज्ञानेश्वर देशमुख, पुष्पा चासकर, रुपाली मरभळ, रंजना बिराजदार, सुनिता कडलग, रुपाली व्यवहारे, स्वाती बिराजदार, निलम वाळुंज, सुनिता काळे, अर्चना शिंदे, भागवत आंधळे, गोविंद वरे, मनोज मांजरे, राजेंद्र पवार, बाळासाहेब थिटे, राजेंद्र कांबळे, मोहन गोपनारायण, हिराबाई गायकवाड, पंढरीनाथ शिवले यांनी केले.
