अतुल देशपांडे,

            सातारा-(हवेलीनामा प्रतिनिधी) .डोक्यात कुऱ्हाडीचा घाव घालून महिलेने प्रियकराचा खून केल्याची घटना आगाशिवनगर(ता. कऱ्हाड) येथील इंगवले वस्तीत आज पहाटे तीनच्या सुमारास घडली. खुनानंतर संबंधित महिलेने पोलिसांना त्याबाबत माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोचून पंचनामा करत महिलेस ताब्यात घेतले. खुनाचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. राजेंद्र मरिआप्पा काळे (वय ४५, रा. शिवाजी स्टेडिअम पाठीमागे, कऱ्हाड) असे खून झालेल्या व्यक्तीचे, तर सारिका चंद्रकांतकोळी (वय ४०, रा. इंगवलेवस्ती, मलकापूर) आगाशिवनगर असे ताब्यात घेतलेल्या महिलेचे नाव आहे.

दरम्यान, याप्रकरणी संशयित सारिका कोळीला पोलिसांनी अटक केली आहे. तिच्यावर खुनाचा गुन्हा नोंद केला असून, आज न्यायालयात हजर केले असता तिला २० फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. पोलिस उपनिरीक्षक कृष्णा डिसले तपास करीत आहेत.घटनास्थळावरील माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी पतीचे निधन झाल्याने चार वर्षांपासून सारिका कोळी या तीन मुलींसह आगाशिवनगरच्या इंगवले वस्तीत वास्तव्यास आहेत. गवंड्याकडे रोजंदारीचे काम करते. तिला तीन मुली असून, दोघींचे लग्न झाले आहे. एका लहान मुलीसह ती सध्या राहते. राजेंद्र काळे आणि सारिका कोळी यांचे प्रेमसंबंध होते. काळे हा तिच्यावर संशय घेत होता. आज पहाटे प्रियकर राजेंद्र काळे हा तिच्या घरी आला. पहाटेच त्या दोघांमध्ये वाद झाला. रागाच्या भरात संबंधित महिलेने प्रियकराच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून त्याचा खून केला. खून केल्यानंतर याबाबत तिने स्वतः पोलिसात माहिती दिली. माहिती मिळताच पोलिस उपअधीक्षक राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे, गुन्हे प्रकटीकरण शाखेचे निखिल मगदूम यांच्यासह अधिकारी व कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळ व मृतदेहाचा पंचनामा * करून मृतदेहासह खून करणाऱ्या महिलेस ताब्यात घेतले. खुनामागचे कारण काय? याचा तपास पोलिस करत आहेत.

              परिसरात ‘कुणकूणही नाही

संबंधित महिला गवंड्याच्या हाताखाली मजुरी करते. ती सकाळी कामाला जायची, सायंकाळी घरी यायची. शेजाऱ्यांबरोबर जास्त संपर्क नव्हता. संबंधित महिलेने कुऱ्हाडीने घाव घालत प्रियकराचा खून केल्याची घटना घडली. मात्र, या घटनेची शेजारी किंवा परिसरातील कोणालाही कसलीच माहिती नव्हती. पहाटे पाचच्या सुमारास थेट पोलिस घटनास्थळी आल्यावर घरमालकांना याबाबत माहिती मिळाली. परिसरात ११ वाजेपर्यंत या प्रकाराची कोणाला माहिती नसल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *